केस गळतीपासून ते पांढरे होण्यापर्यंत विविध समस्या दूर करतात ‘ही’ ४ फुले

Published:
आयुर्वेदानुसार अशी अनेक फुले आहेत जी केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
केस गळतीपासून ते पांढरे होण्यापर्यंत विविध समस्या दूर करतात ‘ही’ ४ फुले

Home Remedies for Hair Fall:   आजकाल वाढते प्रदूषण आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे, बहुतेक लोकांना केस गळणे, पांढरे होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत, केस निरोगी ठेवण्यासाठी लोकांना निरोगी आहार, पुरेसे पाणी आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

या सर्व गोष्टींसोबतच औषधी गुणधर्मांनी समृद्ध काही फुले केसांसाठी वापरली जाऊ शकतात. आयुर्वेदानुसार अशी अनेक फुले आहेत जी केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यामुळेच आज आपण जाणून घेऊया की केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी कोणती फुले वापरली जाऊ शकतात……

जाई-
जाईच्या फुलांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते कोरडेपणा दूर करण्यास, केस मऊ करण्यास, केसांना चमकदार बनविण्यास, टाळूला खोलवर पोषण देण्यास, टाळूच्या संसर्गापासून बचाव करण्यास, डोक्यातील कोंडा कमी करण्यास, केस तुटणे आणि गळणे रोखण्यास आणि केस चमकदार करण्यास मदत करतात.

रोझमेरी-
रोझमेरीच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये असंख्य पोषक घटक असतात. ते टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास, केसांची वाढ करण्यास, केस पांढरे होणे रोखण्यास, केस गळती बंद करण्यास, डोक्यातील कोंडा रोखण्यास आणि टाळूला खोलवर पोषण देण्यास मदत करतात.

लॅव्हेंडर-
लॅव्हेंडरमध्ये अँटीमाइक्रोबियल आणि इतर गुणधर्म आहेत. याचा वापर केल्याने टाळू स्वच्छ होण्यास, केसांची वाढ होण्यास, टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढण्यास, टाळूला खोलवर पोषण देण्यास आणि केसांना मऊ आणि चमकदार बनविण्यास मदत होते.

जास्वंद-
जास्वंदच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यांचा वापर केल्याने केसांची वाढ होण्यास, टाळूची खाज कमी करण्यास, डोक्यातील कोंडा कमी करण्यास, नैसर्गिकरित्या कसे काळे करण्यास आणि टाळूला पोषण देण्यास मदत होते. निरोगी केसांसाठी जास्वंदच्या फुलांचे तेल किंवा हेअर मास्क वापरता येते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews