प्रसूतीनंतर खूपच केसगळती होतेय? मग लगेच आहारात सामील करा ‘हे’ पदार्थ

Published:
डिलिव्हरीनंतर केसांना पोषण देण्यासाठी आहारातून योग्य योग्य पोषण शरीरात घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
प्रसूतीनंतर खूपच केसगळती होतेय? मग लगेच आहारात सामील करा ‘हे’ पदार्थ

Remedies for postpartum hair loss:   स्त्रिया आई झाल्यानंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यातील एक बदल म्हणजे अचानक केस गळणे, ज्याला डिलिव्हरीनंतर केस गळणे म्हणतात. ही स्थिती डिलिव्हरीनंतर दोन ते पाच महिन्यांच्या दरम्यान सर्वात सामान्य असते. अनेक महिला घाबरतात, परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की ही एक सामान्य आणि तात्पुरती प्रक्रिया आहे.

डिलिव्हरी होताच, हार्मोनची पातळी कमी होते आणि गर्भधारणेदरम्यान न गळणारे केस गळू लागतात. या काळात जलद रिकव्हरी करण्यासाठी आणि केसांना पोषण देण्यासाठी योग्य पोषण अत्यंत महत्वाचे आहे. आज आपण प्रसुतिपूर्व केस गळती रोखण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घेऊ शकतो याबाबत जाणून घेऊया….

लोहयुक्त पदार्थ –
गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणादरम्यान, शरीरातून रक्त कमी होते. ज्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. या स्थितीमुळे केसांची मुळे कमकुवत होतात. पालक, बीट, डाळिंब, गूळ, संपूर्ण धान्य आणि हिरव्या पालेभाज्या हे लोहाचे चांगले स्रोत आहेत.

अक्रोड-
अक्रोड हे विशेषतः महिलांसाठी एक सुपरफूड मानले जाते. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, बायोटिन, व्हिटॅमिन ई आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. जे केसांची मुळे मजबूत करतात आणि टाळूला पोषण देतात. दररोज २-३ अक्रोड खाल्ल्याने केस गळणे फारच कमी होऊ शकते.

दही-
दही केवळ पचनासाठी फायदेशीर नाही.तर त्याचे प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन बी१२ केसांची मुळे मजबूत करते. दह्यातील कॅल्शियम आणि प्रथिने केसांना पोषण देतात. ते टाळूला थंड करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. तुमच्या प्रसूतीनंतरच्या आहारात दररोज एक वाटी ताजे दही समाविष्ट करा.

झिंकयुक्त पदार्थ-
झिंकच्या कमतरतेमुळेदेखील केस गळती होऊ शकते. हे खनिज केसांच्या ऊती दुरुस्त करण्यास मदत करते आणि टाळू निरोगी ठेवते. भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे आणि हरभरा हे चांगले स्रोत आहेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews