Yoga to Prevent Hair Fall:  आजकाल प्रत्येकालाच मजबूत, जाड आणि लांबलचक केस हवे असतात. परंतु केस तुटणे आणि केस गळणे ही आजकाल सामान्य समस्या आहे. जी बहुतेक लोकांना जाणवते. वयानुसार होणारे हार्मोनल बदल केसांच्या वाढीवर परिणाम करू शकतात.

पण, योग ही समस्या दूर करू शकतो आणि टाळूमध्ये रक्त प्रवाह नियंत्रित करू शकतो. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या निरोगी, लांब केस हवे असतील, तर तुमच्या दिनचर्येत ही काही योगासने समाविष्ट करा. ही योगासने कोणती आहेत पाहूया…..

सर्वांगासन-
सर्वांगासन, ज्यामध्ये खांद्यावर उभेराहिले जाते. हे आसन स्नायूंना बळकटी देते. या आसनाच्या नियमित सरावाने शरीरात रक्ताभिसरण सुधारते. हात आणि खांदे मजबूत करण्यासोबतच, मेंदूच्या स्नायूंमध्ये नियमित रक्त प्रवाह देखील राखला जातो.त्यामुळे केस गळणे, विरळ होणे अशा केसांच्या विविध समस्या दूर होतात. आणि केसांची चांगली वाढ होते.

उत्तानासन-
उत्तनासन हा प्रकार सूर्यनमस्कारच्या आसनांमध्ये समाविष्ट आहे. हे योगासन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि केस गळती रोखता येते. नियमित सरावाने केस गळतीपासून आराम मिळू शकतो. यामुळे पायांच्या स्नायूंमध्ये गोळे येण्यापासूनही बचाव होऊ शकतो.

पादहस्तासन-
हे आसन केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केसांना चमक देते. हे आसन दररोज केल्याने केसांची लांबी वाढते. हे आसन शरीरातून डोक्याकडे रक्तप्रवाह खेचते. त्यामुळे केसांच्या समस्या आणि कोंडा कमी होतो.

पर्वतासन –
पर्वतासन आपली स्मरणशक्ती सुधारते. केसांच्या वाढीसाठी देखील हे एक चांगले आसन आहे. कोंडा असलेल्यांसाठी हे आसन विशेषतः फायदेशीर आहे. हे आसन आपले खांदे मजबूत करते आणि आपली पचनक्रिया सुधारते. खराब पचनक्रियेमुळे केस गळू शकतात. म्हणून, हे आसन केल्याने पचन आणि केसांची वाढ दोन्ही सुधारते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)