तुम्ही कधी पिलाय का लसणाचा चहा? डायबिटीसपासून ते थायरॉईडपर्यंत मिळतात अनेक फायदे

Published:
तज्ज्ञांच्या मते, दिवसातून एक कप लसणाचा चहा पिल्याने अनेक आजारांपासून आराम मिळेल.
तुम्ही कधी पिलाय का लसणाचा चहा? डायबिटीसपासून ते थायरॉईडपर्यंत मिळतात अनेक फायदे

Benefits of Garlic Tea:  आयुर्वेदानुसार जर एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर त्याला आजार होण्याची शक्यता कमी असते. लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. लसूण आपण नेहमीच खातो. पण तुम्ही कधी लसणाचा चहा पिलाय का.

लसणाचा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते, शिवाय श्वसनाचे संसर्ग दूर ठेवते. दिवसातून एक कप लसणाचा चहा पिल्याने अनेक आजारांपासून आराम मिळेल. त्यामुळेच आपण लसणाच्या चहाचे फायदे जाणून घेऊया…..

सायनससाठी उपयुक्त-
लसूण केवळ श्वसन संसर्गातच मदत करत नाही तर सायनसच्या समस्या कमी करते. जर तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर तुम्ही लसूण कुस्करून खाऊ शकता. तसेच आले आणि हळद घालून लसणाचा चहा पिऊ शकता. हा चहा सायनसची समस्या कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

थायरॉईडसाठीफायदेशीर-
शरीरातील थायरॉईड संप्रेरकांमध्ये असंतुलन झाल्यास एखाद्या व्यक्तीच्या समस्या वाढू शकतात. आले आणि लसूण चहा अशा लोकांसाठी खूप प्रभावी आहे. हा चहा थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन ठेवण्यास मदत करेल.

डायबिटीससाठी फायदेशीर-
आजकाल अनेकांना रक्तातील साखरेच्या समस्येचा सामना करावा लागतो. कमी आणि उच्च रक्तदाब दोन्ही गंभीर समस्या बनू शकतात. म्हणून, ज्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात नाही त्यांच्यासाठी आले आणि लसूण चहा खूप फायदेशीर आहे.हा चहा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.

मासिक पाळीसाठी फायदेशीर-
मासिक पाळीच्या वेळी अनेक महिलांना पोटात खूपच वेदना होतात. त्यामुळे गरम आले आणि लसणाचा चहा पिल्याने या वेदना कमी होऊ शकतात. या चहाचे गुणधर्म वेदना असलेल्या भागावर शेकसारखे काम करतात. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी करते.

श्वसन समस्या-
आले आणि लसणाच्या चहामुळे श्वसन समस्या कमी होण्यास मदत होते. आल्यामधील जिंजरॉल आणि लसणातील अ‍ॅलिसिन कंपाऊंड श्वसन समस्या कमी करण्यास मदत करतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews