तुम्ही कधी खाल्लंय का खुड मिरचीचे पाणी? जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Published:
अलीकडे अनेक जुन्या पारंपारीक रेसिपी नाहीशा होत आहेत. त्या पुन्हा नव्याने रुजू करण्यासाठी त्याच्या रेसिपी माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्ही कधी खाल्लंय का खुड मिरचीचे पाणी? जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Khud Mirchi pani recipe:  भारतीय खाद्यसंस्कृती फारच उत्तम आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. प्रत्येकाची चव फारच छान असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा अनेक पारंपरिक पदार्थ बनवले आणि खाल्ले जातात.

परंतु अलीकडे अनेक जुन्या पारंपारीक रेसिपी नाहीशा होत आहेत. त्या पुन्हा नव्याने रुजू करण्यासाठी त्याच्या रेसिपी माहिती असणे आवश्यक आहे. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे खुड मिरचीचे पाणी होय.

बऱ्याच लोकांना खान्देशी पदार्थ माहितीच नाही. हा पदार्थ फारच प्रसिद्ध आहे. आज आपण हा पारंपरिक पदार्थ कसा बनवायचा ते जाणून घेणार आहोत. याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

 

साहित्य-

मिरच्या: 20-25 लाल किंवा हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार
पाणी: 2-3 कप
हळद: 1/2 चमचा
मीठ: चवीनुसार
हिंग: 1/2 चमचा (पर्यायी)
लिंबू: 1-2 (पर्यायी)

खुड मिरचीचे पाणी बनवण्याची रेसिपी-

 

मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. त्यांना थोडं गरम पाण्यात घालून वाफवून घ्या. त्यानंतर त्यांची साल काढून टाका.

एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात  मिरच्या, हळद, मीठ आणि हिंग मिक्स करा.

आता पाणी  5-7 मिनिटे उकळू द्या.

पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या.

गरम पाणी थंड झाल्यावर लिंबूचा रस मिक्स करा.

थंड झाल्यावर हे पाणी सर्व्ह करा.