केळी खाण्याचे फायदेच नाहीत तर तोटेही आहेत; त्यामुळे ‘ही’ समस्या उद्भवू शकते, जाणून घ्या

Published:
केळी हे आरोग्यदायी आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. हे कॅलरीज, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले आहे. केळ्याला सुपरफूड म्हणतात. पण त्याचे फायदे आहेत तसेच तोटेही, ते जाणून घ्या.
केळी खाण्याचे फायदेच नाहीत तर तोटेही आहेत; त्यामुळे ‘ही’ समस्या उद्भवू शकते, जाणून घ्या

केळीचे प्रत्येक आजारात सेवन केले जाते. केळीमध्ये कॅल्शियम, कार्ब्स आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणूनच बरेच लोक ते त्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग बनवतात, परंतु कधीकधी केळी सेवन करणे हानिकारक ठरू शकते. केळी हे आरोग्यदायी आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. हे कॅलरीज, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले आहे. पण ते चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने वजन वाढू शकते. यामुळे पोट फुगू शकते आणि चरबी वाढू शकते.

सर्दी आणि खोकला वाढतो

केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु जर कोणाला सर्दी, खोकला किंवा इतर समस्या असतील, तर त्यांनी केळी खाणे टाळणे आवश्यक आहे. रात्री केळी खाणे टाळावे, कारण यामुळे खोकला आणि सर्दी वाढू शकते. जर शरीरात कफ वाढला असेल तर केळी खाणे टाळावे.  

वजन वाढते

केळीचे फायदे असले तरी रात्री खाल्ल्याने काही तोटेही होऊ शकतात. केळीमध्ये कॅलरीज जास्त असल्यामुळे रात्री खाल्ल्यास वजन वाढू शकते आणि पचनक्रिया बिघडू शकते. 

झोप न लागणे

रात्रीच्या जेवणानंतर जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यास झोप न लागण्याची समस्या येऊ शकते. केळीमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रात्री खाल्ल्यास पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे झोप न लागण्याची समस्या येऊ शकते.

अ‍ॅसिडिटी

केळीमध्ये नैसर्गिकरित्या साखर आणि अमीनो ऍसिड असतात, जे रिकाम्या पोटी घेतल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि अ‍ॅसिडिटी वाढू शकते. 
केळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी वाढू शकते. 

मधुमेह

मधुमेही लोकांसाठी जास्त केळी खाणे हानिकारक असू शकते. ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनीही केळी खाऊ नये. यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात.

ऍलर्जी

जर तुम्हाला ऍलर्जीची समस्या असेल तर केळी खाणे टाळा. यामुळे तुम्हाला अधिक समस्या येऊ शकतात. काही लोकांना केळीची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर लालसर डाग, खाज येणे किंवा इतर ऍलर्जी संबंधित लक्षणे दिसू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews