Health News : सकाळी उठल्या उठल्या काय खायला हवं? 99 % लोकांना माहीत नसेल

Written by:Smita Gangurde
Published:
दिवसभर ताजंतवानं आणि उत्साही वाटावं यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता हे महत्त्वाचं असतं.
Health News : सकाळी उठल्या उठल्या काय खायला हवं? 99 % लोकांना माहीत नसेल

दिवसभरातील सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. सकाळची सुरुवात योग्य पदार्थांसह केली तर दिवसभर ऊर्जा टिकून राहते. पोट खराब होत नाही. झोपही येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा चांगलाच असायला हवा. आहारतज्ज्ञ सांची शेट्टी यांनी सांगितलं की, रात्रभर काहीही न खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी शरीर पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतो. त्यामुळे शरीराची झालेली झिज भरून निघेल असे पदार्थ खायला हवेत.

आहारतज्ज्ञांनुसार सकाळची सुरुवात कोणत्या पदार्थांनी करावीत

सकाळी रिकाम्या पोटी काय खायला हवं

एक चमचा तूप

शरीराला तणाव, थकवा, पोट साफ न होणे यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अशावेळी औषधी गुणांनी भरपूर पदार्थांनी दिवसाची सुरुवात केली जाऊ शकते.स्वत: आहारतज्ज्ञ सकाळची सुरुवात एक चमचा तूप खाऊन करतात. तूप हार्मोन्स संतुलित ठेवते. तूप गटहेल्थसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतं. क्रेविक्स दूर राहतात आणि दिवसभर उत्साही वाटतं. तूप खायचं नसेल तर नारळाचं तेल किंवा ड्राय फ्रूट्स खाऊन दिवसाची सुरुवात करू शकता.

हळद-आल्याचे शॉट्स

हळद-आल्याच्या शॉट्सचा शरीराला चांगला फायदा होतो.हळदीमधील अॅक्टिव्ह कंपाऊंड करक्यूमिन शरीरातील इंफ्लेमेशन कमी करतं. ब्लोटिंग, थकवा आणि मॅटॉबॉलिज बूस्ट करते. आलं पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. आल्यामुळे शरीर डिटॉक्स होतं. पचनासह हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत मिळते.

प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे शरीराला फायबर आणि प्रोटीन मिळतील. गाजर, शिमला मिरची, मशरूम, पालक आणि टॉमेटो या भाज्यांना पनीर किंवा अंड किंवा टोफूसह हलकसं परतवून खाऊ शकता. मेटॉबॉलिजन बूस्ट करायला, ऊर्जा वाढवायला, डोपामिन आणि सेरोटोनिन वाढविण्यासह मेमरी, इमोशनल बॅलेन्स आणि फोकस वाढविण्यासाठी या नाश्त्याचा उपयोग होऊ शकतो.

हे स्नॅक्सही खाऊ शकता

सकाळी सिजनल फळे, ड्राय फ्रूट खाऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा, विटॅमिन, अँटी ऑक्सिडेंट आणि हेल्दी फॅट्स मिळतात.