Benefits of eating raw vegetables: अनेक वर्षांपासून तज्ज्ञ निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस करतात. हिरव्या भाज्या आपल्याला सर्व आवश्यक पोषक तत्वे देतात आणि आपल्या एकूण आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. निरोगी आहार आपल्याला अनेक रोगांपासून वाचवू शकतो. हिरव्या भाज्या खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.
लोक सामान्यतः शिजवलेल्या भाज्या खाण्यास प्राधान्य देतात. परंतु कच्च्या भाज्यांमध्ये शिजवलेल्या भाज्यांपेक्षा जास्त फायबर असते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील जास्त असते. आज आपण कोणत्या भाज्या कच्च्या खाल्ल्याने जास्त फायदे होतात याबाबत जाणून घेऊया…..
ढोबळी मिरची-
लाल आणि पिवळ्या ढोबळ्या मिरच्या म्हणजेच शिमला मिरच्यांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास प्रभावी ठरतात. तुम्ही त्या कधीकधी कच्च्यादेखील खाव्यात. कारण शिजवल्यानंतर त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात.
पालक-
हिवाळ्यात पालक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. पालक हे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी६, रिबोफ्लेविन, फॉलिक अॅसिड, नियासिन आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. पालकामध्ये लोहाचे प्रमाण देखील चांगले असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालक कच्ची खाल्ल्यास जास्त फायदे मिळतात.
गाजर-
गाजर आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. गाजर शिजवण्याऐवजी किंवा वाफवण्याऐवजी कच्चे खाण्याची शिफारस केली जाते. शिजवल्यावर त्यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम नष्ट होतात.
मुळा-
मुळा पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. मुळा नियमित सेवन केल्याने पित्ताशयाचे खडे, कावीळ, यकृताचे आजार आणि अपचन यापासून आराम मिळतो. मुळा शिजवण्याऐवजी कच्चा खाल्ल्यास अनेक फायदे मिळतात.
ब्रोकोली-
ब्रोकोलीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अनेक गुणधर्म असतात. असे म्हटले जाते की, ब्रोकोली खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. त्यात असलेले सल्फोराफेन संयुग या आजाराशी लढण्यास मदत करते. बऱ्याचदा ते कच्चे देखील खावे. कारण शिजवल्यानंतर त्यातील पौष्टिक गुणधर्म कमी होण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





