तुम्हालाही रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Published:
तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता? वेळीच सावध व्हा....
तुम्हालाही रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आपल्यापैकी अनेकजण हे चहाप्रेमी आहेत. काही लोकांना चहाशिवाय झोपच येत नाही, तर काही जणांना दर तासाला चहा पिण्याची सवय असते. काहींना तर सकाळी डोळे उघडताच हातात चहा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का की, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो.

उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये. हे आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी आहे. कारण त्याने पोटातील ऍसिड वाढते आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. तसेच रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमच्या पचनापासून इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

माऊथ अल्सर

अल्सर म्हणजेच साधारणपणे आपण याला तोंड येणं असं म्हणतो. रात्री जेवणानंतर सहा ते सात तास पोट रिकामे असते. त्यानंतर सकाळी झोपेतून उठल्या नंतर लगेच चहा प्यायल्याने पोटातील आम्ल पित्त खवळते. त्याने अल्सरची समस्या उद्भवू शकते.

अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात

सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा प्यायल्याने पोट साफ होते. मोशन होण्यास मदत होते असं अनेकाना वाटते. मात्र चहामुळे गॅसची तक्रार वाढते. चहाच्या अतिसेवनामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटाच्या तक्रारी सुरू होतात.

मधुमेह

चहा प्यायल्याने मधुमेह होण्याची शक्यता असते. चहामध्ये आपण साखर टाकतो. साखर खाल्ली की शरीरातसुद्धा साखरेचं प्रमाण वाढतं याने मधुमेह होतो. त्यामुळे शक्य तितका चहा प्यायचा टाळा. बहुतेक डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना साखरेचा चहा न पिण्याचा सल्ला देतात.

लठ्ठपणा

लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनलीय. बऱ्याच लोकांचं हेच ध्येय असतं, लठ्ठपणा कमी करणे! चहाच्या सेवनामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा तुम्हाला जर कमी करायचा असेल तर चहा पिण्यावर नियंत्रण असुद्या.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews