लोखंडी की मातीची कोणत्या भांड्यात अन्न शिजवणे जास्त फायदेशीर? जाणून घ्या

Published:
काही भांड्यांमध्ये जास्त रासायनिक संयुगे असतात. म्हणून, जेव्हा तुम्ही त्यात गरम काहीतरी शिजवता तेव्हा भांड्यांमधील घटक अन्नातदेखील जातात.
लोखंडी की मातीची कोणत्या भांड्यात अन्न शिजवणे जास्त फायदेशीर? जाणून घ्या

Which utensils are beneficial for cooking food:   भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळी लोक स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करत असत. पण बदलत्या काळानुसार लोखंडी आणि स्टीलच्या भांड्यांचाही वापरसुरू झाला. आजकाल सोशल मीडियामुळे काचेच्या भांड्यांचा वापर करण्याची क्रेझही प्रचंड वाढली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चुकीच्या भांड्यांचा वापर केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते.

काही भांड्यांमध्ये जास्त रासायनिक संयुगे असतात. म्हणून, जेव्हा तुम्ही त्यात गरम काहीतरी शिजवता तेव्हा भांड्यांमधील संयुगे अन्नात देखील जातात. यामुळे आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, बरेच लोक माती आणि लोखंडी भांडी वापरण्यास प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहिती आहे का यापैकी कोणते भांडे आरोग्यासाठी चांगले आहे. आज आपण याबाबतच जाणून घेऊया….

लोखंडी भांड्यांचे फायदे-
लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने अन्नात लोह शोषण्यास मदत होते. जर तुमच्यात लोहाची कमतरता असेल तर ती वापरल्यास फायदा मिळेल. लोखंडी भांडी रसायनमुक्त असतात, त्यामुळे ती शिजवण्यास सुरक्षित असतात. ती बराच काळ टिकतात आणि शरीराला विविध फायदे देखील देतात.

मातीच्या भांड्याचे फायदे-
मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणेदेखील आरोग्यदायी आहे. ते अन्नाची चव आणि पोषक तत्वे दोन्ही वाढवतात. ते अन्न अजिबात कोरडे करत नाही. मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने अन्न बराच काळ गरम राहते. यामुळे अन्नातून विषबाधा किंवा रासायनिक प्रक्रिया होत नाही.

आरोग्यासाठी लोखंडी भांडी की मातीची भांडी जास्त चांगली?
दोन्ही प्रकारची भांडी स्वयंपाकासाठी फायदेशीर आहेत. परंतु तज्ज्ञांच्या मते, लोखंडी भांडी अधिक फायदेशीर मानली जातात. स्वयंपाकासाठी फक्त मर्यादित भांडी वापरा. जर तुम्ही जास्त प्रमाणात लोहाचे सेवन करत असाल तर, तुम्ही जास्त लोखंडी भांडी टाळावीत. अशा परिस्थितीत तुम्ही मातीची भांडी वापरू शकता.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews