तांब्याच्या बाटलीतून गरम पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Published:
लोक पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा आणि भांड्यांचा वापर करतात. काही लोक तांब्याच्या बाटल्यांमधून पाणी पितात कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
तांब्याच्या बाटलीतून गरम पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Disadvantages of drinking hot water from a copper bottle:   अलीकडच्या धावपळीच्या जगात अनेक आरोग्य समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे लोक निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. म्हणूनच, निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक मानले जाते.

लोक पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा आणि भांड्यांचा वापर करतात. काही लोक तांब्याच्या बाटल्यांमधून पाणी पितात कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु, तांब्याच्या बाटल्यांमधून गरम पाणी प्यावे की नाही याबद्दल बरेच लोक गोंधळलेले असतात. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तांब्याच्या बाटलीमधून गरम पाणी प्यावे कि नाही…..

तांब्याच्या बाटलीतून गरम पाणी प्यावे कि नाही?
तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या बाटलीतून गरम पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तांबे हा एक धातू आहे जो उष्णतेच्या संपर्कात आल्यावर रासायनिक प्रतिक्रिया देतो. जेव्हा तुम्ही तांब्याच्या बाटलीत गरम पाणी भरता तेव्हा तांबे पाण्यात विरघळू शकते आणि त्याची रासायनिक रचना बदलू शकते.

त्यामुळे पाण्यात तांब्याचे अंश येऊ शकतात. जे तुमच्या शरीरासाठी हानिकारक मानले जातात. शिवाय, तांब्याच्या बाटलीत गरम पाणी ओतल्याने ते गंजू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ, उलट्या, अतिसार आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात. महत्वाचे म्हणजे जास्त तांबे तुमच्या शरीरात जमा होऊ शकते. ज्यामुळे तांब्याचा विषारीपणा वाढून तुम्हाला डोकेदुखी, मळमळ आणि पोटदुखी होऊ शकते.

पित्त दोष वाढते-
आयुर्वेदानुसार, तांबे शरीरातील पित्त दोष संतुलित करण्यास मदत करते. परंतु जेव्हा तांब्याच्या बाटलीत गरम पाणी ओतले जाते तेव्हा ते पित्त दोष वाढवू शकते. गरम पाण्यामुळे तांब्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते. ज्यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होऊ शकते. म्हणून तांब्यात गरम पाणी पिणे टाळा.

तांब्यामुळे केमिकल रिऍक्शन येते-
तांबे हा एक धातू आहे आणि जेव्हा त्यात गरम पाणी मिसळले जाते तेव्हा त्यावर रासायनिक अभिक्रिया होते. या अभिक्रियेदरम्यान, तांबे पाण्यात विरघळू शकते आणि तांब्याचे तुकडे तयार करू शकते. जेव्हा तांबे मोठ्या प्रमाणात शरीरात जाते तेव्हा ते शरीराला हानिकारक ठरू शकते.

पचनसंस्थेवर परिणाम-
तांब्याच्या बाटलीतील गरम पाणी पिल्याने पाणी दूषित होऊ शकते. ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटात जळजळ, वेदना, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त असल्यास पोटाच्या आवरणाला नुकसान होऊ शकते आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)