Healthy morning routine in Marathi: सकाळची वेळ जवळपास सर्वांसाठीच खास असते. कारण सकाळी सकाळी लोक दिवसाची सुरुवात करतात. जर प्रत्येकानेच सकाळची सुरुवात योग्यरीत्या केली तर आरोग्यात चांगला बदल दिसू शकतो. तुम्ही सकाळी जे काही करता जे काही खातापिता त्याचा परिणाम दिवसभर तुमच्या शरीरात दिसून येतो.
सकाळी सकाळी जर सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी केल्या तर, तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यदेखील लाभेल. त्यामुळेच आज आपण अशा काही टिप्स जाणून घेऊया ज्या सकाळी फॉलो केल्यास तुम्ही निरोगी आणि सकारात्मक राहाल. चला जाणून घेऊया या सवयींबाबत…..
सूर्योदयाचा आनंद घ्या-
सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. कारण लवकर उठून सूर्योदयाचा आनंद घेणे आरोग्यासाठी फार उत्तम असते. सूर्योदयाचा आनंद घेतल्यास ताजेतवाने वाटून मानसिक आरोग्य तर सुधारतेच. परंतु सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळाळ्याने शारीरिक आरोग्यदेखील चांगले होते.
पाणी पिण्याची सवय-
सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. कारण त्यामुळे दिवसभर साचलेली घाण डिटॉक्स होऊन शरीराबाहेर टाकली जाते. शिवाय तुम्हाला एनर्जेटिक वाटते. तसेच दिवसभर जर पाण्याची कमतरता असेल तर ती याद्वारे पूर्ण केली जाते.
व्यायाम-
सकाळी-सकाळी व्यायाम करणे अतिशय फायदेशीर असते. कारण सकाळी योगा किंवा चालण्यासारखा साधासोपा व्यायाम केल्यास शरीर ऍक्टिव्ह होते. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवाय आळस दूर होऊन एक उत्साह जाणवतो. त्यामुळे स्वतःला व्यायामाची सवय लावा.
पौष्टिक नाश्ता-
सकाळी योग्य आणि पौष्टिक नाश्ता केल्याने दिवसभर उत्साही वाटते. नाश्त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम असणारे पदार्थ, फळे, दूध, फळांचा ज्यूस यांचा समावेश करावा. कारण सकाळी जड आणि मसालेदार नाश्ता केल्याने पचनक्रिया बिघडू शकते.
दिवसभरासाठी एक वेळापत्रक बनवा-
अनेकदा कामाच्या व्यापामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दिनचर्येचा एक वेळापत्रक बनवून ठेवावा. जेणेकरून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे शक्य होईल. आणि सर्व कामे योग्यरीत्या पूर्ण करता येतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





