Remedies to remove bed bugs from home: घरामध्ये अनेकदा ढेकूण दिसून येतात. खरं तर अंथरुणाला जास्त काळ सूर्यप्रकाशात न ठेवल्यामुळे ढेकूण होतात. ढेकूण खासकरून रात्री चावतात, ज्यामुळे लोकांची झोप बिघडते. त्यामुळे शरीरावर लाल पुरळ देखील येतात. अशा परिस्थितीत लोक ढेकणांपासून मुक्त होण्यासाठी विविध पद्धती ट्राय करून पाहतात. परंतु तरीही फायदा होत नाहीत.
जर तुम्हालाही या समस्येने त्रास होत असेल आणि तुम्ही त्यातून आराम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही ढेकणांपासून आराम मिळवू शकता…..
पुदिना-
ढेकणांना पुदिन्याचा वास सहन होत नाही. त्यामुळे काही पुदिन्याची पाने घ्या आणि ती तुमच्या पलंगाजवळ किंवा ढेकुण झालेत त्या जागी ठेवा. तीन किंवा चार दिवसांनी, जुनी पाने काढून टाका आणि त्या जागी नवीन पाने लावा. अशाने ढेकूण दूर पळतील.
कडुलिंबाची पाने-
कडुलिंबामध्ये कीटकांना दूर ठेवणारे सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात. कडुलिंबाची पाने ढेकूण लपण्याच्या ठिकाणी ठेवा. त्यांचा वास ढेकूण दूर करतो किंवा मारतो. तुम्ही कडुलिंबाचे तेल, पाणी आणि थोडे कापूर पावडर मिसळून स्प्रे तयार करू शकता आणि ते बेड, गाद्या आणि सोफ्यावर स्प्रे करू शकता.
बेकिंग सोडा-
ढेकूण लपण्याच्या ठिकाणांभोवती (कोपरे, भेगा इ.) बेकिंग सोडा शिंपडा. बेकिंग सोडा ढेकूण मारतो. सुमारे एक आठवडा तसेच राहू द्या. एका आठवड्यानंतर, व्हॅक्यूम क्लिनरने ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा-
व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण बनवा आणि ते स्प्रे बाटलीत भरा. हे मिश्रण ढेकूण असलेल्या ठिकाणी स्प्रे करा. व्हिनेगर आणि कडुलिंबाचे तेल,कडुलिंबाच्या पानांचे पाणी यांचे मिश्रण देखील वापरले जाऊ शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





