Marathi News

KBC मध्ये एक कोटी जिंकल्यानंतर खात्यात किती रक्कम येते? खूप कमी जणांना माहिती आहे याचं उत्तर

Written by:Smita Gangurde
Published:
'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या सीजनला पहिला करोडपती मिळाला आहे.
KBC मध्ये एक कोटी जिंकल्यानंतर खात्यात किती रक्कम येते? खूप कमी जणांना माहिती आहे याचं उत्तर

‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीजनला पहिला करोडपती मिळाला आहे. उत्तराखंडला राहणारे आणि सीआयएसएफमध्ये कमांडेट पदावर कार्यरत आदित्य कुमार यांनी आपलं ज्ञान आणि समजुतीच्या जोरावर एक कोटींचं बक्षीस जिंकलं आहे. अशात ११ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सीजनमध्ये इतकी मोठी रक्कम जिंकणारे आदित्य हे पहिले उमेदवार आहेत.

किती टॅक्स लागतो?

केबीसीमध्ये जिंकलेल्या उमेदवाराला एक कोटींची संपूर्ण रक्कम मिळते की नाही याबाबत साशंकता असते. खरंच त्यांना संपूर्ण रक्कम मिळते का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण जिंकलेल्या रक्कमेवर आयकर नियमांतर्गत कर लावला जातो. टॅक्स कापल्यानंतर उरलेली रक्कम विजेत्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

आदित्यच्या खात्यात किती रक्कम जाणार?

आदित्य कुमार हे या सीजनचे पहिले करोडपती आहेत. १ कोटी विजेत्या रक्कमेतून कर वजा केल्यानंतर त्यांच्या खात्यात साधारण ६५.६८ लाख रुपये येतील. याचा अर्थ एक कोटी रकमेतून तब्बल ३४ लाख कर वजा केला जाईल. विजेत्याला ही रक्कम इनकम टॅक्स रिटर्न फाइल करताना Income from Other Sources प्रमाणे दाखवावी लागेल.

Follow Us :GoogleNews