पार्टी (Hurda Party) हा आजकाल जबरा विषय झालाय….. पार्टी करायला फक्त एक निमित्त लागतय. मग काय हॉटेल आणि ढाबा, नुसता धुळ्ळा…. परंतु तीच तीच पनीरची भाजी, काजू करी, चिकन हंडी, मटण रस्सा आणि रोट्या खाऊन अनेकांचं मन भरलेल असतंय… अशावेळी यातून वेगळेपणा अनुभवायला एखादी जबराट पार्टी करायचं तुमच्या डोक्यात आलं असेल तर आम्ही तुमच्यासाठी असेच एक पार्टीची आयडिया घेऊन आलोय…. हुरडा पार्टी… जणु या नावातच दम आहे… तुम्हाला हुरडा पार्टी म्हणजे काय माहिती आहे का वो?? अहो सध्याच्या थंडीच्या दिवसात म्हणजे नोव्हेंबर पासून ते अगदी फेब्रुवारी पर्यंत अनेकजण हुरडा पार्टीचा बेत आखत असतात…. चला तर मग आपण या पार्टीचे खास वैशिष्ट्य जाणून घेऊया…
हुरडा पार्टी म्हणजे काय? Hurda Party
हुरडा पार्टी म्हणजे हिवाळ्यात साजरा होणारा एक पारंपरिक कार्यक्रम, कुठेतरी दूर शेतात जायचं आणि वस्तीवर या पार्टीचं नियोजन करायचा प्लान केला जातो. हुरडा शब्दाचा अर्थ ज्वारीची कोवळी कणसे… ही कणसे आगीमध्ये किंवा शेकोटीत भाजून मग हातावर चोळून किंवा पोत्यामध्ये बदडली जातात आणि त्यानंतर लोक या भाजलेल्या ज्वारीचे दाणे कणसापासून वेगळे करून, गरमगरम खाण्याचा आनंद घेतात आणि यासोबत जेवणाचा आणि मनोरंजनाचा आनंद घेतात. ज्वारी आणि थंडीचा नातच घट्ट आहे… एकीकडे थंडीमुळे तापमानाचा पारा जसा खाली जातो तसे तसे ज्वारीच्या पिकाला जोर येतो.
हुरडा पार्टीचे फायदे काय
ज्वारीच्या कोवळ्या दाण्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते,
हुरडा (Hurda Party) पचनासाठी चांगला असतो आणि फायबरचा चांगला स्रोत आहे.
ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे शरीर मजबूत होते.
शरीरात कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हुरडा उपयोगी ठरतो.
गव्हाप्रमाणेज्वारीतग्लुटेन नसतं. यात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणूनही करता येतो.






