नवरा बायकोचं नातं (Husband And Wife Relation) तसं प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं …. संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकलायचा असेल तर नवरा आणि बायको या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे असं म्हणतात…. नवरा बायको एकमेकांना तितकाय जीव लावते एकमेकांची काळजी घेते तितकच दोघांचा संसार फुलतो… कारण नातेतील गोडवा टिकला तर असे नातं टिकतं…. काही नवरे तर बायकोची बैलोबा असतात… बायको म्हणेल तसेच ऐकतात आणि तेच करतात .त्यामुळे अशा नवऱ्यांना कधीकधी घरातील इतर लोकांचे बोल खावे लागते. . मात्र आता एका अभ्यासात असे समोर आलं आहे की, जो नवरा आपल्या बायकोचे ऐकतो तोच आयुष्यात सुखी राहतो आणि यशस्वी सुद्धा होतो. होय आम्ही सांगतोय ते अगदी खर आहे
तुमच्या पत्नीला आनंदी ठेवा- Husband And Wife Relation
अमेरिकेतील द गॉटमन इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक डॉ. जॉन गॉटमन यांनी आनंदी आणि अखंड विवाहाच्या वैशिष्ट्यांचा वर्षानुवर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांना याबाबत माहिती समोर आली. नवरा बायकोच्या नात्याबद्दल गॉटमन यांनी असं एक सत्य उघड केले आहे…. नुकतच लग्न झालेल्या नवीन लोकांच्या सुखी संसारासाठी गॉटमन यांनी एकच सल्ला दिला आहे, तो म्हणजे तुमच्या पत्नीला आनंदी ठेवा! पुरुषांनी त्यांच्या पत्नींचे ऐकावे आणि व्यावसायिक करिअर मध्ये सक्रिय भूमिका घ्यायला लावावी असं गॉटमन यांनी सांगितलं आहे.
पत्नीचे समर्थन करा
गॉटमन सल्ला देतात की पुरुषांनी त्यांच्या पत्नींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याबाबत सहमत असले पाहिजे.. आपल्या पत्नीला कधीही कोणत्या गोष्टीसाठी विरोध करू नये. बहुतेकदा असे घडते की जे पुरुष आपल्या पत्नींच्या प्रभावाचा प्रतिकार करतात ते त्यांना कळत नकळत असे करतात. हे घडते, आणि ते ठीक आहे, परंतु प्रभाव कसा स्वीकारायचा हे शिकण्याची वेळ आली आहे. “तुमच्या जोडीदाराकडे दररोज लक्ष देऊन आणि त्यांना पाठिंबा देऊन ही एक मानसिकता आणि कौशल्य दोन्ही विकसित होते, डॉक्टरांनी असेही स्पष्ट केलं की भावनिकदृष्ट्या मोठ्या मनाचा नवरा आपल्या बायकोचा प्रभाव स्वीकारण्याची शक्यता जास्त असते . आणि तो तिला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. कारण कोणतीही भावना व्यक्त करण्यात त्याला संकोच वाटत नाही.





