‘ही’ लक्षणे दिसली तर समजा तुम्ही गर्भवती आहात

Published:
मासिक पाळी चुकल्यावर किती दिवसांनी कळतं तुम्ही गर्भवती आहात की नाही, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष ...
‘ही’ लक्षणे दिसली तर समजा तुम्ही गर्भवती आहात

स्त्रिच्या आयुष्यातील आई होणं सर्वांत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण, बऱ्याचदा गर्भधारणा झाली आहे, हे कसे ओळखायचे हेच माहिती नसते. त्याची लक्षणं काय असतात, आपल्या शरीरावर आणि स्वभावात कोणते असे बदल होतात, ज्याने गर्भधारणा झाली आहे, हे ओळखता येते. तर तुम्ही गरोदर झाला आहात की नाही, ते ओळखण्याची कोणती लक्षणं दिसतात, ते पाहुया…

थकवा जाणवणे

गर्भधारणेनंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. यामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. जर मासिक पाळी चुकण्यासोबतच खूप थकवा येत असेल तर हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते.

मळमळ जाणवणे

गर्भधारणेनंतर, महिलांना सकाळी उठल्यावर उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटू शकते. हे दिवसभरात कधीही होऊ शकते. हार्मोनल बदलांमुळे हे होऊ शकते. जर अशी लक्षणे आढळली तर गर्भधारणा चाचणी करावी.

वारंवार लघवी होणे

​गर्भधारणा झाल्यानंतर शरीरात रक्तप्रवाह वाढतो आणि मूत्राशयावर ताण येतो. यामुळे स्त्रीला लघवी वारंवार लागते, जरी ती फारसं पाणी पित नसली तरीही. हे लक्षण पाळीच्या आधी फारसे जाणवत नाही, त्यामुळे ही एक महत्त्वाची पूर्वचिन्हं ठरू शकते.

स्तनांमध्ये बदल

गर्भधारणेनंतर, स्तनांमध्ये बदल जाणवू शकतात. यामुळे स्तनात जडपणा, सूज आणि वेदना होऊ शकतात. ही गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

मासिक पाळी

मासिक पाळी नियमित येत असल्यास ती चुकली असेल, तर सर्वात आधी प्रेगनंसी टेस्ट करायला हवी. पाळी चुकणे हे गर्भधारणेच्या निश्चित लक्षणापैकी एक आहे. पण ज्यांची पाळी अनियमित आहे, त्यांना मात्र काही हे लक्षण दिसू शकत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews