Marathi News

आहारात समाविष्ट करा काळे गहू, आरोग्याला मिळतील प्रचंड फायदे

Published:
काळे गहू शरीर निरोगी ठेवण्यासोबतच, ते शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करते.
आहारात समाविष्ट करा काळे गहू, आरोग्याला मिळतील प्रचंड फायदे

Benefits of Black Wheat:  तुम्ही कधी काळे गहू खाल्लेत का? काळा गहू शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. सामान्य गव्हापेक्षा वेगळा असण्यासोबतच त्याच्या पिठापासून बनवलेल्या चपात्याही काळ्या असतात. हा गहू पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात झिंक, प्रथिने, तांबे, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी१ आढळते. या गहूच्या सेवनाने पचनसंस्थेशी संबंधित समस्या कमी होतातच, शिवाय शरीराचा अशक्तपणाही दूर होतो.

शरीर निरोगी ठेवण्यासोबतच, ते शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करते. याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रित राहते. आतड्यांमध्ये मल मऊ करून बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. आज आपण काळे गहू खाण्याचे इतर फायदे जाणून घेऊया……

पचनसंस्थेसाठी फायदेशीर-
जर नियमित गव्हाची चपाती खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत असेल, तर तुमच्या आहारात काळ्या गव्हाची चपाती समावेश करा. ही चपाती खाल्ल्याने केवळ बद्धकोष्ठता दूर होत नाही तर मल मऊ होतो आणि पोट स्वच्छ होण्यास मदत होते. त्यातील फायबरचे प्रमाण पचनक्रिया निरोगी राखण्यास मदत करते.

डायबिटीससाठी फायदेशीर-
डायबिटीसमध्ये काळ्या गव्हाची चपाती खाल्ल्यास ते रक्तातील साखर कमी करण्यास आणि शरीर निरोगीराखण्यास मदत करते. ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी, काळ्या गव्हाचे सेवन केल्याने मधुमेह होण्याचा धोका कमी होतो आणि निरोगी शरीर राखले जाते.

हृदयासाठी फायदेशीर-
काळ्या गव्हात मॅग्नेशियम भरपूर असते. जे निरोगी हृदय राखण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. त्याच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. काळ्या गव्हाचे सेवन उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते.

अशक्तपणा कमी करते-
काळ्या गव्हात लोह भरपूर प्रमाणात असते.जे फक्तअशक्तपणा कमी करण्यास मदत करत नाही तर शरीराला शक्ती देखील प्रदान करते. ते खाल्ल्याने आरोग्य सुधारतेच शिवाय अनेक रोगांचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे शरीराची ऑक्सिजन पातळी देखील सुधारते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews