Remedies to keep the liver healthy: लिव्हर म्हणेजच यकृत हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर रक्त शुद्ध करण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी जबाबदार आहे.
परंतु चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली यकृतावर जास्त ताण आणतात. ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि पचन समस्या उद्भवतात.पण काही घरगुती ड्रिंक्स आहेत जी लिव्हरमधील अशुद्धता काढून टाकण्यास आणि उष्णता शांत करण्यास मदत करू शकतात.
आल्याचा चहा –
अनेकांना आल्याच्या चहाची चव आवडते. विशेष म्हणजे हा चहा यकृतासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. TOI च्या अहवालानुसार, आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे एक संयुग असते. जे यकृतातील चरबी कमी करू शकते. फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांनी नियमितपणे आल्याचा चहा प्यायल्यास, यकृतातील चरबी आणि जळजळ कमी होईल.
ब्लॅक कॉफी –
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ब्लॅक कॉफी यकृतातील एंजाइमची पातळी कमी करते आणि चरबीचे ऑक्सिडेशन वाढवते. यामुळे फॅटी लिव्हर रोगाचा धोका कमी होतो. यकृतातील चरबी कमी करण्यासाठी कॉफी खूप प्रभावी आहे. पण दिवसातून २-३ कपपेक्षा जास्त कॉफी पिणे टाळा.कारण त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात.
आवळ्याचा रस –
आवळ्याचा रस यकृतासाठी देखील उत्कृष्ट आहे. आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. जे यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. हे पोषक तत्व यकृताच्या डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देतात आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात. दररोज एक ग्लास आवळा रस पिल्याने यकृताचे आजार टाळता येतात.
लिंबू पाणी –
लिंबू पाणी पिल्याने यकृत नैसर्गिकरित्या निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे. लिंबू पाणी यकृतातील नैसर्गिक एंजाइम सक्रिय करते. चरबी कमी करण्यास आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करते. सकाळी लवकर लिंबू पाणी पिल्याने यकृत डिटॉक्स होते. ते यकृताच्या पेशी स्वच्छ करते आणि ताजेतवाने करते.
हळदीचे दूध –
या दुधाला अनेकदा गोल्डन मिल्क म्हटले जाते कारण ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. हळदीचे दूध यकृताच्या पेशींना पुन्हा निर्माण करण्यास मदत करते. ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते आणि यकृतातील चरबी काढून टाकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





