कमजोर आतड्यांमुळे सतत इन्फेक्शन होतंय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय बनवतील एकदम मजबूत

Published:
आयुर्वेदानुसार, आपल्या आतड्यांना मजबूत केल्याने केवळ पचन सुधारत नाही तर एकूण आरोग्य देखील सुधारते.
कमजोर आतड्यांमुळे सतत इन्फेक्शन होतंय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय बनवतील एकदम मजबूत

Ayurvedic remedies for healthy intestines:   आजच्या धावपळीच्या जगात बदलेली जीवनशैली, अनियमित खाण्याच्या सवयी आणि वाढत्या ताणतणावांमुळे पचनाच्या समस्यादेखील वाढत आहेत. खासकरून सतत पोट बिघडणे आणि आतडे कमकुवत होणे सामान्य होत आहेत. जेव्हा आतडे कमकुवत होतात तेव्हा अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. आणि शरीराला पुरेसे पोषण देखील मिळत नाही.

यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, अतिसार आणि कमकुवत रोग प्रतिकारशक्ती यासारख्या समस्या उद्भवतात. कमकुवत आतड्यांमुळे दीर्घकाळात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आयुर्वेदानुसार, आपल्या आतड्यांना मजबूत केल्याने केवळ पचन सुधारत नाही तर एकूण आरोग्य देखील सुधारते. आज आपण आतडे मजबूत आणि निरोगी बनवणारे काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया…..

बेल-
आयुर्वेदात, बेलला वात आणि कफ शांत करणारे मानले जाते. बेल फळाचा लगदा आतड्यांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. बेल बद्धकोष्ठता दूर करण्यास, पचन सुधारण्यास आणि आतड्यांचे अस्तर मजबूत करण्यास मदत करते. रिकाम्या पोटी बेलचा रस किंवा ताज्या बेल फळाचा लगदा सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि थंडावा मिळतो.

सुंठ-
आयुर्वेदात सुंठ म्हणजेच वाळलेले आले हे पचनक्रिया सुरळीत करणारे औषध मानले जाते. त्याची चव गोड, कडू असते.उष्ण स्वभावामुळे मुळे ज्यांची आतडे कमजोर असतात त्यांच्यासाठी सुंठ अमृतसारखे असते. यासाठी अर्धा ग्रॅम सुंठ पावडर दिवसातून एकदा कोमट पाणी किंवा मधासह घेतल्याने आतड्यांची शक्ती वाढते.

नागरमोथा-
नागरमोथा हे एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे जे त्रिदोष शामक मानले जाते. म्हणजेच ते वात, पित्त आणि कफ तिन्ही दोष संतुलित करते. तज्ज्ञांच्या मते एप्रिल ते सप्टेंबर हे महिने नागरमोथा खाण्यासाठी सर्वोत्तम काळ आहेत. ते आतड्यांतील जळजळ कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि आतड्यांची हालचाल सामान्य करण्यास मदत करते. दररोज १ ग्रॅम नागरमोथा पावडर घेणे फायदेशीर ठरू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews