iPhone 17 Series: Apple ने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आयफोन 17 ची नवी सिरीज लॉन्च केली आहे. आज १९ सप्टेंबरपासून आयफोनच्या नव्या सिरीजच्या विक्रीला सुरवात झाली आहे. आयफोन सेल सुरु होतास ऍपल स्टोअरमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. आयफोन 16 पेक्षा आयफोन 17 ला जास्त मागणी असल्याची माहिती समोर येत आहे. लोकांमध्ये आयफोन १७ ची एक वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. आयफोनच्या या नव्या सिरीजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स, आयफोन एयर असे व्हर्जन पाहायला मिळत आहेत.
ऑरेंज कलरला मागणी-
आयफोन स्टोअरच्या रिपोर्टनुसार नवी आयफोन सिरीज लॉन्च होताच तरुणाईमध्ये त्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. आयफोन 17 सिरीजमध्ये कॉस्मिक ऑरेंज कलरला विशेष मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. या कलरची मागणी इतकी वाढत आहे की, अवघ्या तीन दिवसांत अमेरिका आणि भारतात सर्व मॉडेल्स विकले गेले आहेत.
मी मुस्लिम पण…
दिल्लीमध्ये आयफोन स्टोअरला आयफोन सिरीज लॉन्च होताच रात्रीपासूनच स्टोअरच्या बाहेर खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. दरम्यान एका मुस्लिम तरुणाने आयफोन 17 खरेदी केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, आयफोनमध्ये हा कलर मला फारच आवडला. ऑरेंज कलरचा आयफोन छान वाटत आहे. मी मुस्लिम आहे पण मला हा रंग खूप आवडतो’.
ऑरेंज कलरचा आयफोन आउट ऑफ स्टॉक-
भारतात आयफोन 17 ची नवी सिरीज लॉन्च होताच डिमांड वाढली आहे. ऍपलच्या रिपोर्टनुसार आयफोन 17 प्रो मॅक्सचे ऑरेंज मॉडेल आता उपलब्ध नाहीय. वाढत्या मागणीमुळे हा मॉडेल लगेचच आउट ऑफ स्टॉक झाला आहे. ऍपल कंपनी तो लवकरात लवकर पुन्हा स्टॉकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आयफोन 17 ची किंमत-
आयफोन 17 च्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 256 व्हेरियंटची किंमत 82,900 आहे. आणि आयफोन 17 च्या 512 जीबी व्हेरियंटची किंमत 1,02,900 इतकी आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






