Sat, Dec 27, 2025

घोरण्याची समस्या त्रास देतेय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय लगेच करतील मदत

Published:
आयुर्वेदात घोरणे आणि नाकाच्या समस्यांसाठी अनेक उपाय सांगितले आहेत जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ही समस्या दूर करण्यास मदत करू शकतात.
घोरण्याची समस्या त्रास देतेय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय लगेच करतील मदत

Ayurvedic remedies for snoring:  बहुतांश लोकांना घोरण्याची सवय असते. घोरणे ही एक सामान्य समस्या आहे. आणि बरेच लोक या समस्येने ग्रस्त आहेत. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ही समस्या त्रासदायक ठरू शकते. परंतु कधीकधी घोरणाऱ्या व्यक्तीलासुद्धा ती त्रासदायक ठरू शकते. कारण ही समस्या दिसते तितकी सोपी नसते. अनेकदा ती एक जुनाट आजारामुळे असू शकते.

जीवनशैलीतील छोटा-छोटे बदल, जसे की वजन कमी करणे, झोपण्यापूर्वी मद्यपान टाळणे किंवा कुशीवर झोपणे, यामुळे घोरणे थांबण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदात घोरणे आणि नाकाच्या समस्यांसाठी अनेक उपाय सांगितले आहेत जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ही समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. आज आपण घोरण्याच्या समस्येवर असेच काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया…..

गाईचे तूप-
डॉक्टरांच्या मते, सकाळी किंवा रात्री तुमच्या नाकपुड्यात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाकल्याने तुम्हाला चांगली झोप येते. डोकेदुखी, तणाव, मायग्रेन इत्यादींपासून आराम मिळतो, तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, ऍलर्जी कमी होते, स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक आरोग्य सुधारते.

झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या नाकपुड्यात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाकावे. हे २१ दिवस ते तीन महिने करा. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल, तुमचे मन शांत होईल, डोकेदुखी कमी होईल आणि महत्वाचे म्हणजे घोरणे कमी होईल.

अनु तेल-
जर तुम्हाला गाईचे तूप वापरायचे नसेल तर तुम्ही अनु तेल वापरून पाहू शकता. हे एक आयुर्वेदिक तेल आहे जे नस्य थेरपीसाठी वापरले जाऊ शकते. परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरले पाहिजे.

तुपात तळलेले लसूण-
त्यांनी सांगितले की लसूण घरीही सहज उपलब्ध आहे. लसूणच्या दोन पाकळ्या तुपात भाजून औषध म्हणून घेतल्याने घोरण्यापासून आराम मिळतो.

भाजलेले लवंग-
रात्री झोपण्यापूर्वी भाजलेले लवंग खाल्ल्याने घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

कोमट पाणी आणि मध-
घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळून हळूहळू प्यायल्यानेही घोरण्यापासून आराम मिळेल.

ऑलिव्ह ऑइल-
ऑलिव्ह ऑइल देखील एक अतिशय प्रभावी उपाय आहे. नाकात दोन थेंब टाकणे किंवा ते  तेल टाकून नाकाने वाफ घेणे देखील घोरण्यापासून आराम देऊ शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)