मुंबई– महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांवर टोलवर वेळ वाया जाऊ नये यासाठी फास्टॅग ही यंत्रणा अस्तित्वात आली. जास्त वेळ न थांबता टोल देण्याची ही प्रथा जितकी फायदेशीर आहे तितकीच ती धोकादायक ठरण्याचीही शक्यता आहे.
सायबर चोरांनी आता फास्ट टॅगला टार्गेट करण्याचं ठरवलंय. फिसिंग लिंक, खोट्या कस्टमर केअरचे नंबर्स, आणि आऱएफआय़डीच्या क्लोनिंगनं अनेक जणं या जाळ्यात अडकताना दिसतायेत. अनेक वाहन चालक तर कोणतीही चूक नसतानाही पैसे गमावताना दिसतायेत.
काय आहे फास्टॅग घोटाळा?
या घोटाळ्यातील आरोपी फास्टॅगशी संबंधित माहिती किंवा पैसे आधीच हडपतात. त्यासाठी खोटे फोन कॉल्स, एसएमएस, वेबसाईट किंवा क्यूआर कोडचा वापर केला जातो. या आरोपींच्या जाळ्यात सापडून तुमची वैयक्तिक माहिती त्यांना दिलीत तर ते तुमच्या बँक खात्यातील रक्कम रिकामी करतात.
फास्ट टॅगमध्ये होणारे साधारण फ्रॉड कोणते?
फास्ट स्टॅगशी संबंधित सायबर चोर नेहमी निरनिराळे फंडे वापरतात. मात्र त्यातही काही पद्धतींनी धोका देण्याची पद्धत सामान्यपणे एकत्र दिसते. त्या पद्धती समजून घेतल्या तर तुमची फसवणूक टळेल.
1. फास्टटॅग ब्लॉक झाल्याचा मेसेज पाठवतात.
2. बनावट कस्टमर केयरच्या नंबरवरुन फोन करुन तुमच्याकडे डिटेल्सची मागणी
3. गाडीतील फास्टॅग स्कॅन करुन त्याचं क्लोन तयार केलं जातं.
4. सोशल मीडियावर खोटे आणि जुन्या फास्ट टॅगची विक्री
5. रिचार्ज करण्यासाठी पूर्ण क्यूआर कोड पाठवण्याची विनंती
6. केवायसी अपडेटच्या बहाण्यानं बँक डिटेल्स आणि ओटीपीची मागणी
7. व्हॉट्सअप ग्रुपवर ऑफरच्या नावानं स्कॅम लिंक पाठवण्यात येते.
8. खोटे मेसेज पाठवून यूपीआय अॅपमध्ये ऑटो डिबेट सेट करतात.
कसा ओळखाल फास्ट टॅग घोटाळा ?
1. फास्टटॅग बंद झाल्याचा मेसेज
2. लिंक उघडताच दुसरीच वेबसाईट समोर दिसणं
3. क्यूआर कोड स्कॅन करण्याचा दबाव टाकणे
4. ओटीपीचा पिन मागणे
5. खोट्या वेबसाईटवर लॉक चिन्ह नसणं
बदलत्या तंत्रज्ञानानुसार चोरी करण्याची पद्धतही बदलू लागलेली आहे. अशा स्थितीत घरात एकट्या राहणाऱअया आई – वडिलांना किंवा याचं ज्ञान नसलेल्यांना याची जाणीव करुन देणं अत्यंत गरजेच आहे. अन्यथा मोठं नुकसान पदरात पडण्याची शक्यता अधिक आहे.





