Immunity Booster Foods in Marathi: हिवाळ्यात थंड हवामानामुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या हंगामी आजरांचे प्रमाण वाढत आहे. खरं तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने असे होते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे संसर्ग आणि आजारांचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता वाढते.
म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आहारात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सुपरफूड्स समाविष्ट केले पाहिजेत. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेऊया….
सिट्रस फळे-
सिट्रस फळे अर्थातच आंबट फळे हे व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्रोत आहेत. जे पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीस मदत करतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल रोगप्रतिकारक पेशींच्या निर्मितीस मदत करतात.
गरम मसाले-
गरम मसाल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लीमेंट्री आणि अँटी बॅक्टरीअल गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते हिवाळ्यासाठी एक उत्तम सुपरफूड बनते. दालचिनी अनेक रोगांना प्रतिबंधित करण्यास मदत करते. शरीराला आतून उबदार ठेवते आणि शरीराचे तापमान वाढवून सर्दी आणि तापापासून आराम देते. म्हणूनच हिवाळ्यात लोक सर्दीपासून बचाव करण्यासाठी लवंग, वेलची, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र इत्यादींपासून बनवलेले काढे पितात.
हळद-
हळदीतील कर्क्यूमिनमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म भरपूर असतात. ते बी-पेशी, टी-पेशी आणि मॅक्रोफेज सारख्या विविध रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
लसूण-
लसूण मॅक्रोफेज, लिम्फोसाइट्स आणि नैसर्गिक किलर पेशी यांसारख्या रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसूणमध्ये असलेले अॅलिसिन हे एक शक्तिशाली अँटीमायक्रोबियल एजंट आहे जे अनेक रोगांना प्रतिबंधित करण्यास मदत करते. खाण्यापूर्वी लसूण कुस्करल्याने अॅलिसिनचे प्रमाण वाढते.
बदाम-
बदामांमधील निरोगी फॅट्स हिवाळ्यासाठी त्यांना एक उत्तम पर्याय बनवतात. ते शरीराला उबदार ठेवतात आणि आवश्यक ऊर्जा प्रदान करतात. बदामात विविध जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, लोह आणि पोषक तत्व असतात.जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





