सांधेदुखीमध्ये आवर्जून खा ‘हे’ पदार्थ, सूज कमी होऊन दूर होतील वेदना

Published:
हिवाळ्यात बहुतांश लोकांना सांध्यांमध्ये सूज येऊन सांधेदुखीची समस्या त्रास देत असते.
सांधेदुखीमध्ये आवर्जून खा ‘हे’ पदार्थ, सूज कमी होऊन दूर होतील वेदना

Food for joint pain:  हिवाळ्यात अनेक लोक सकाळची सुरुवात गुडघे आणि सांधेदुखीने करतात. ही समस्या केवळ वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्येही दिसून येते. तापमान कमी होत असताना, शरीरात रक्ताभिसरण कमी होते.

यामुळे सांध्याभोवतीचे स्नायू कडक होतात आणि सांध्यातील नैसर्गिक तेल घट्ट होते. म्हणूनच हिवाळ्यात चालताना सांधे कडक होऊन वेदना वाढतात. त्यामुळेच आज आपण सांध्यांतील वेदना कमी करण्यासाठी काही पदार्थ जाणून घेऊया…..

हिरव्या पालेभाज्या-
पालक, मेथी यासारख्या हिरव्या पालेभाज्या हिवाळ्यात मुबलक प्रमाणात असतात. त्या कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात जे सांध्यांचे संरक्षण करतात आणि झीज टाळतात. दररोज एक वाटी हिरव्या भाज्या सांध्याची ताकद मजबूत करतात.

हेल्दी फॅट्स-
वजन वाढण्याच्या भीतीने लोक अनेकदा तूप, तेल आणि हेल्दी फॅट्स कमी करतात. परंतु तज्ञ म्हणतात की ही एक मोठी चूक आहे. दररोज एक चमचा ऑलिव्ह ऑइल सांध्यांची जळजळ कमी करते. याव्यतिरिक्त, एवोकॅडो, बदाम, काजू आणि मिक्स बिया देखील कार्टिलेजचे संरक्षण करतात आणि सांध्यातील ग्रीस वाढवतात.

अँटीइन्फ्लीमेंट्री-
हळद आणि आले हे नैसर्गिक अँटीइन्फ्लीमेंट्री पदार्थ आहेत. सकाळी उठल्यावर तुम्हाला स्नायूंमध्ये जाणवणारा कडकपणा शरीरात वाढत्या जळजळीचे लक्षण आहे. हळदीतील कर्क्यूमिन आणि आल्यातील जिंजरॉल ही संयुगे आहेत जी सूज लवकर कमी करतात. सकाळी कोमट दुधात किंवा आल्याच्या चहात हळद दोन्ही सांध्यासाठी उपचार म्हणून काम करतात.

व्हिटॅमिन सी-
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ सांध्यांसाठी फारच उपयुक्त आहेत. लिंबू, संत्री, पेरू आणि ढोबळी मिरचीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी ऊतींच्या दुरुस्तीला गती देते आणि जळजळ कमी करते.

ओमेगा-३-
शरीराला ओमेगा-३ फॅटी अॅसिडची आवश्यकता असते विशेषतः हिवाळ्यात. यामुळे फक्त सांधे लवचिक बनत नाहीत तर सूजदेखील कमी करतात. यामध्ये सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल सारखे मासे सांध्यांची हालचाल सुलभ करतात. संशोधनात असेही दिसून आले आहे की ओमेगा-३ सांध्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews