Marathi News

कफ दोष नियंत्रित करण्यासाठी दिनचर्येत करा ‘हे’ बदल, लगेच मिळेल आराम

Published:
आयुर्वेदानुसार शरीरात कफ दोष वाढल्यास विविध शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
कफ दोष नियंत्रित करण्यासाठी दिनचर्येत करा ‘हे’ बदल, लगेच मिळेल आराम

Home remedies for Kapha dosha:  आयुर्वेदानुसार, शरीरात वात, पित्त आणि कफ असे तीन दोष असतात. यापैकी कोणतेही दोष असंतुलित झाल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. आज कफ दोषाबद्दल जाणून घेऊया. जेव्हा शरीरात ते असंतुलित होते तेव्हा लोकांना जास्त प्रमाणात श्लेष्मा निर्माण होणे, पचन समस्या, वजन वाढणे, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

तज्ज्ञांच्या मते, या समस्या टाळण्यासाठी आपल्या दिनचर्येत काही चांगल्या सवयी अवलंबणे महत्वाचे आहे. शरीरात कफ दोष संतुलित करण्यासाठी काय-काय करावे ते जाणून घेऊया…..

योगासन-
जेव्हा कफ दोष वाढतो किंवा असंतुलित होतो, तेव्हा सूर्यनमस्कार, धनुरासन, उष्ट्रासन आणि कपालभाती यांसारखे योगासन करणे फायदेशीर ठरते. यामुळे रक्ताभिसरण, श्वसन प्रणाली सुधारते आणि ताण कमी होतो. तसेच इतर आरोग्य समस्यांपासून आराम मिळतो.

आयुर्वेदिक चहा-
कफ दोष संतुलित करण्यासाठी, औषधी गुणधर्म असलेल्या ग्रीन टी सारखे आयुर्वदिक चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे कफ दोष संतुलित होण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

दुधाचे सेवन कमी करा-
कफ दोष संतुलित करण्यासाठी, दुधाचे सेवन कमी करा. याव्यतिरिक्त, जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळा. दूध किंवा चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन केल्याने कफ दोष वाढू शकतो. म्हणून या पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

जड अन्न खाणे टाळा-
कफ दोष संतुलित करण्यासाठी हलके अन्न खा. यासाठी, फळे, भाज्या, डाळी, बीन्स आणि कडधान्ये आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. जे आरोग्यासाठी फायदेशीरसुद्धा आहेत. तसेच हा आहार कफ दोषाच्या समस्येपासून आराम मिळविण्यास मदत करते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews