Habits that damage kidneys: किडनी हे मानवी शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. जे रक्त फिल्टर करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. म्हणून, किडनी निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु आपल्या काही दैनंदिन सवयी किडनीला हानी पोहोचवू शकतात आणि किडनीच्या आजाराचा धोका वाढवू शकतात.
आपण अनेकदा या सवयींकडे दुर्लक्ष करतो आणि हळूहळू किडनीचे नुकसान सुरू होते. त्यामुळेच आज आपण कोणत्या सवयी किडनीला नुकसान पोहचवतात याबाबत जाणून घेऊया……
जास्त मीठ खाणे-
दररोज मिठाच्या जास्त सेवनामुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीवर दबाव येतो. प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड आणि खारट स्नॅक्समध्ये जास्त प्रमाणात मीठ असते.
कमी पाणी पिणे-
शरीरासाठी पाणी फारच आवश्यक आहे. पाणी किडनीला विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. कमी पाणी पिल्याने किडनीवर भार वाढतो आणि किडनी स्टोनसारख्या समस्या उद्भवू शकतात.
खूप प्रोटीन खाणे-
जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने किडनीवर दबाव येतो. मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीन जास्त असते. त्यामुळे त्यांचे मर्यादित सेवन करा.
पेनकिलरचे सेवन-
जास्त प्रमाणात पेनकिलर म्हणजेच वेदनाशामक औषध घेतल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते.
मद्यपान करणे-
अल्कोहोल किडनीला नुकसान पोहोचवते आणि किडनीच्या आजाराचा धोका वाढवते. अल्कोहोल लिव्हरचे देखील नुकसान करते, जे किडनीच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
डायबिटीस-
डायबिटीसमध्ये सतत साखरेचे प्रमाण वाढणे किडनीला नुकसान पोहोचवते आणि किडनीच्या आजाराचा धोका वाढतो. रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, किडनी हळूहळू खराब होऊ लागतात आणि किडनीचे नुकसान होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






