Kidney Detox Drink: किडनी हे रक्त फिल्टर करण्यासाठी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी जबाबदार असलेले एक महत्त्वाचे अवयव आहे. चुकीची जीवनशैली, प्रक्रिया केलेले अन्न,पाण्याचे कमी सेवन आणि जास्त प्रमाणात मीठ सेवन यांचा किडनीवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे किडनीत जळजळ, संसर्ग किंवा किडनी स्टोनदेखील होऊ शकतात.
अशा परिस्थितीत, काही नैसर्गिक ड्रिंक्स विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि किडनीचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशा पाच निरोगी ड्रिंक्सबद्दल सांगत आहोत जे प्यायला सुरुवात केल्यास, शरीरातील घाण मूत्राद्वारे सहजपणे काढून टाकू शकतात……
ओव्याचे पाणी-
ओवा किडनीसाठी नैसर्गिक डिटॉक्स एजंट म्हणून काम करते. त्यात मूत्रवर्धक गुणधर्म आहेत जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. रात्रभर पाण्यात एक चमचा ओवा भिजवा, ते गाळा आणि सकाळी प्या. हे पेय किडनी स्टोन बाहेर काढण्यास देखील मदत करते.
लिंबू पाणी-
लिंबूमधील सायट्रिक ऍसिड मूत्रात कॅल्शियमचे स्फटिक तयार होण्यापासून रोखते. दररोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो आणि त्यात असलेले खडे हळूहळू विरघळू शकतात.
हळदीचे पाणी-
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. ज्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचे गुणधर्म असतात. दररोज सकाळी कोमट हळदीचे पाणी पिल्याने किडनीची जळजळ कमी होते आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. किडनीतील स्टोनच्या सुरुवातीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
नारळ पाणी-
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात आणि ते शरीराला हायड्रेट ठेवते. ते लघवीचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे किडनी स्टोन आणि इतर विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. आठवड्यातून ३-४ वेळा सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्याने किडनीचे आरोग्य राखण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





