Benefits of fiber for the body: बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती आहे की फायबरयुक्त पदार्थ आपल्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहेत. फायबर हे शून्य-कॅलरीयुक्त अन्न आहे जे दोन स्वरूपात येते. अविघटनशील आणि विरघळणारे. अविघटनशील फायबर, ज्यामध्ये गव्हाचा कोंडा, काजू आणि अनेक भाज्यांचा समावेश आहे. त्यात खडबडीत पोत असतो जो पाण्यात सहजासहजी मिसळत नाही. ज्यामुळे ते पचनसंस्थेला चिकटून राहण्यापासून रोखते.
तर विरघळणारे फायबर, ज्यामध्ये ओट्स, बीन्स, बार्ली आणि अनेक फळे समाविष्ट आहेत. जे पाण्यात विरघळतात आणि पचनसंस्थेत जेलसारखे पदार्थ तयार करतात. ते साखरेचे शोषण कमी करते आणि नियमितपणे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते. ईटिंगवेलच्या मते, उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात….
मधुमेहापासून बचाव-
फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने टाइप २ मधुमेह टाळता येतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज २६ ग्रॅम किंवा त्याहून अधिक फायबरयुक्त पदार्थ खातात त्यांना मधुमेह होण्याचा धोका १८ टक्के कमी असतो.
वजन कमी करण्यास फायदेशीर-
दररोज फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. ते कॅलरीजचे प्रमाण कमी करतात आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवतात. त्यामुळे ज्यादाचे खाणे रोखले जाते. अशाने वजन कमी होण्यास मदत होते.
नैसर्गिक डिटॉक्सिफाय-
फायबरयुक्त पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे आतडे आणि कोलन स्वच्छ करतात. ज्यामुळे तुमचे शरीर विषारी पदार्थांपासून आपोआप डिटॉक्सिफाय होते.
मजबूत हाडे-
फायबरमध्ये प्रीबायोटिक्स असतात जे शरीराला कॅल्शियमसह पोषक तत्वे हाडांमध्ये शोषण्यास मदत करतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
आतड्यांतील हेल्दी बॅक्टेरिया-
नियमित फायबरचे सेवन केल्याने आतड्यांतील बॅक्टेरिया निरोगी राहतात आणि पोटातील संसर्ग किंवा इतर समस्या टाळता येतात.
बद्धकोष्ठता दूर करते-
फायबरयुक्त पदार्थ बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करू शकतात. त्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या टाळता येतील. त्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारून पोट साफ होण्यास मदत मिळते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





