रोजच्या जेवणातील ‘या’ पदार्थांमुळे होतो किडनी स्टोन, आजच आहारातून करा बाहेर

Published:
बहुतांश लोकांना माहिती नसेल की, आपल्या दररोजच्या आहारातील काही पदार्थांमुळेदेखील किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.
रोजच्या जेवणातील ‘या’ पदार्थांमुळे होतो किडनी स्टोन, आजच आहारातून करा बाहेर

Foods that cause kidney stones:   आजकाल किडनी स्टोन म्हणेजच मुतखडा हा एक सामान्य आजार बनला आहे. किडनी आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो रक्त शुद्ध करण्यासाठी जबाबदार आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी किडनीच्या कार्यात व्यत्यय आणू शकतात. जर बराच काळ योग्य आहार पाळला नाही तर किडनी स्टोन तयार होऊ शकतात. ज्यामुळे पोटात आणि पाठीत वेदना होतात. हे टाळण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्या.

बहुतांश लोकांना माहिती नसेल की, आपल्या दररोजच्या आहारातील काही पदार्थांमुळेदेखील किडनी स्टोनची समस्या होते. काही पदार्थांचे अति सेवन केल्याने ही समस्या निर्माण होते. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत….

ऑक्सेलेटचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ-
ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी बीट, गाजर, बटाटे आणि पालक यासारख्या भाज्या टाळाव्यात. कारण त्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते.जे किडनी स्टोन तयार होण्यास हातभार लावू शकते. ऑक्सलेट कॅल्शियम साठवते आणि लघवी बाहेर पडण्यापासून रोखते.

मांसाहार पदार्थ-
किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी मांसाहार टाळावा कारण त्यात प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे किडनीवर दाब येतो. जे लोक प्रथिनेयुक्त पदार्थ खातात त्यांच्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे यूरिक अॅसिडची पातळी वाढते आणि परिणामी किडनीतील खडे मोठे होतात. अशा रुग्णांनी विशेषतः लाल मांस टाळावे.

कॅफिन-
कॅफिनचे जास्त सेवन केल्याने वारंवार लघवी होऊ शकते.ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने किडनीत खडे होण्याचा धोका वाढतो. जर तुम्हाला आधीच किडनीत खडे असतील तर कॅफिनचे सेवन टाळा किंवा मर्यादित करा.

व्हिटॅमिन सीचे जास्त सेवन-
व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे जास्त सेवन देखील किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून, हे कमी प्रमाणात सेवन करा. किडनीतील खडे असलेल्या रुग्णांनी सोयाबीन, चिकू, बिया, काळे चणे, कच्चे तांदूळ, वांग्याच्या बिया आणि टोमॅटोच्या बियांचे जास्त सेवन टाळावे. हे सर्व स्टोनची समस्या वाढवू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews