Exercises for knee pain:   अलीकडे बदलेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सांध्याचे दुखणे त्रास देत आहे. यामध्ये गुडघेदुखीचासुद्धा समावेश आहे. या समस्येवर उपचार करण्यासाठी बरेच लोक दररोज चालायला सुरुवात करतात. परंतु फक्त चालणे हा एकच उपाय नाही.

खरं तर, गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी, दररोज व्यायाम आणि निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच आज आपण गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे व्यायाम पाहूया. हे व्यायाम गुडघेदुखी कमी करण्यास मदत करतील…..

-गुडघेदुखी कमी करण्यासाठी, स्ट्रेट लेग लिफ्ट म्हणेजच सरळ पाय उचलण्याचा व्यायाम करून पहा. पाठीवर झोपा आणि एक पाय सरळ वर करा. यामुळे तुमच्या मांड्या आणि गुडघे मजबूत होतील आणि वेदना कमी होतील.

-गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी स्ट्रेचिंग हा एक उत्तम व्यायाम आहे. तुम्ही ते बसून किंवा झोपून, एक पाय सरळ पुढे वाकून किंवा भिंतीला टेकून करू शकता. या स्थितीत २०-३० सेकंद राहा. आणि नंतर पाय बदला.

-जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत अँकल स्ट्रेचिंग हा सोपा व्यायाम समाविष्ट करा. वेदना कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

-गुडघेदुखी कमी करण्यासाठी, पाय सरळ ठेवून बसा किंवा पाठीवर झोपा आणि पाय वर करा आणि गुडघे वाकवा. या व्यायामामुळे गुडघ्यांना आराम मिळू शकतो.

-हा व्यायाम आधी उभे राहून आणि नंतर बसून करायचा आहे. त्यासाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नाही, फक्त खुर्चीची आवश्यकता आहे. ते करण्यासाठी, खुर्चीवरून उभे राहा आणि नंतर बसा. प्रत्येक जेवणानंतर 10 वेळा हा व्यायाम करा. हा व्यायाम मांड्या आणि नितंबांना मजबूत करतो आणि गुडघ्यांना आराम देतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)