Marathi News

तुमच्या घराचा काळा स्विचबोर्ड 5 मिनिटांत साफ करा, ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

Published:
घर साफ, स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. मात्र बऱ्याच वेळा आपण स्विच बोर्डकडे तेवढे नीट लक्ष देत नाही. ज्यामुळे स्विच बोर्ड अस्वच्छ आणि काळपट दिसायला लागतो. अशा वेळी अगदी साध्या , सोप्या उपायांनी स्विच बोर्ड सहज साफ करता येतो.
तुमच्या घराचा काळा स्विचबोर्ड 5 मिनिटांत साफ करा, ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

घराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण खूप लक्ष देतो. पण आजकाल वेळेच्या कमतरतेमुळे काही लोक स्वच्छतेकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत ते अधूनमधूनच स्वच्छता करतात किंवा विद्युत वस्तू वापरून घर स्वच्छ करतात. मात्र बऱ्याच वेळा आपण स्विच बोर्डकडे तेवढे नीट लक्ष देत नाही. ज्यामुळे स्विच बोर्ड अस्वच्छ आणि काळपट दिसायला लागतो. अशा वेळी अगदी साध्या , सोप्या उपायांनी स्विच बोर्ड सहज साफ करता येतो. अशा वेळी काही साध्या सोप्या उपायांनी स्विच बोर्डची सफाई करता येते जाणून घेऊया…

पॉवर बंद करा

सर्वप्रथम, लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुमच्या घराचा इलेक्ट्रिक स्विचबोर्ड स्वच्छ कराल तेव्हा प्रथम वीजपुरवठा बंद करा. त्यानंतरच ते स्वच्छ करा. जर वीजपुरवठा बंद केला नाही तर विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते....

बेकिंग सोडा

तुमचा घराचा काळा स्विचबोर्ड 5 मिनिटांत बेकिंग सोड्याने साफ करता येईल. बेकिंग सोडा आणि पाणी यांसारख्या उपायांमुळे स्विचबोर्डवरील डाग निघू शकतात. एका भांड्यात एक कप गरम पाणी आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. या मिश्रणात टूथब्रश बुडवून स्विचबोर्डवर लावा आणि थोडा वेळ (1-2 मिनिटे) तसेच राहू द्या. त्यानंतर, ब्रशने किंवा कापडाने स्वच्छ करा आणि स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. 

व्हिनेगर 

तुमच्या घराचा काळा पडलेला स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी, व्हिनेगरचे मिश्रण वापरा. एका कप पाण्यात 2 चमचे व्हिनेगर आणि 1 चमचा लिंबूचा रस मिसळा. या मिश्रणात टूथब्रश बुडवून स्विचबोर्डवर लावा आणि 5 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा आणि कोरड्या कपड्याने पुसा.

टूथपेस्ट

तुम्ही टूथपेस्ट वापरून इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड चिमूटभर स्वच्छ करू शकता. टूथपेस्टमुळे अवघ्या 5 मिनिटांत स्विच बोर्ड चमकू लागेल आणि त्यावरील काळे डाग आणि घाणही लवकरच साफ होईल. एका भांड्यात 4 ते 5 चमचे टूथपेस्ट घ्या. त्यात दोन चमचे बेकिंग सोडा टाका. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि पेस्ट तयार करा. त्यानंतर तुम्ही त्यात पाण्याचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. मग ही पेस्ट तुमच्या स्विच बोर्डवर लावा आणि 5 मिनिटे तसेच राहू द्या. . त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा आणि स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. असे केल्याने तुमचा स्विचबोर्ड चमकेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews