कढीपत्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ‘या’ प्रकारे सेवन करा

Published:
अनोशेपोटी कडीपत्त्याच्या पानांचा रस प्यायल्याने वजन कमी होते. यामुळे शरीर डीटॉक्स होते आणि पचनक्रिया सुधारते.
कढीपत्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ‘या’ प्रकारे सेवन करा

कढीपत्त्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. भारतीय स्वयंपाकघरासाठी कढीपत्ता खूप महत्वाचा मानला जातो. कढीपत्ता अनेक पदार्थांमध्ये देखील वापरला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की कढीपत्ता केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच फायदेशीर नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. कढीपत्त्याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते, तसेच शरीर डिटॉक्स होण्यास देखील मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा कसा वापर करू शकता ते जाणून घेऊया…

कढीपत्त्याचा रस

कढीपत्त्याचा रस वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. कढीपत्त्याचा रस चयापचय वाढवतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता मेटाबॉलिझम वाढवतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

कढीपत्त्याचा रस तयार करण्याची पद्धत

कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. एक ग्लास गरम पाणी घेऊन, त्यात कढीपत्त्याची पाने 5-10 मिनिटे उकळवा. पाणी थंड झाल्यावर, त्यात लिंबू किंवा मध मिक्स करून प्या. रोज सकाळी उपाशीपोटी या रसाचे सेवन करा.

कढीपत्त्याची पाने चावून खा

सकाळी उपाशीपोटी 10-12 कढीपत्त्याची पाने चावून खावी. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता चयापचय सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कढीपत्ता शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

कढीपत्त्याच पाणी

कढीपत्त्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करू शकते, कारण ते चयापचय वाढवते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. कढीपत्त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात, ज्यामुळे ते शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. कढीपत्त्याचे पाणी चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एक कप पाणी घ्या आणि त्यात 10-20 कढीपत्त्याची पाने घाला. पाणी उकळायला ठेवा आणि 5-10 मिनिटे उकळू द्या. नंतर पाणी थोडं थंड होऊ द्या  आणि गाळून घ्या. आपण यात थोड मध किंवा लिंबाचा रस देखील मिसळू शकता. 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत  नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews