सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवतो का? बऱ्याच लोकांना चांगली झोप मिळत नाही ज्यामुळे दिवसभर त्यांच्यावर परिणाम होतो. पुरेशी झोप असूनही थकवा जाणवल्यास, अनेक कारणं असू शकतात. यामध्ये, लोह किंवा व्हिटॅमिनची कमतरता, झोपेच्या समस्या ताण, किंवा काही वैद्यकीय समस्या यांचा समावेश होतो. यामागे नेमके काय कारण असू शकतात हे जाणून घेऊया…
व्हिटॅमिनची कमतरता
मानसिक ताण
शारीरिक आणि मानसिक ताण तुमच्या शरीराची ऊर्जा कमी करतो, ज्यामुळे तुम्हाला सतत थकलेला अनुभव येतो. ताण झोपेच्या चक्रात व्यत्यय आणतो, ज्यामुळे तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळत नाही. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर तुम्हाला गाढ झोप लागण्यात समस्या येऊ शकते.
झोपेची अनियमित वेळ
जर तुम्ही रोजची झोपण्याची वेळ ठरलेली नसेल तर त्याचा तुमच्या शरीराच्या जैविक घड्याळावर परिणाम होतो. अनियमित वेळेमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ताही खराब होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो.
चुकीची जीवनशैली
वैद्यकीय स्थिती
पुरेशी झोप असूनही थकवा जाणवतो, तर ते चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा काही वैद्यकीय समस्यांमुळे होऊ शकते. झोप पूर्ण नसली, तरी वजन वाढणे, रक्तदाब वाढणे आणि मधुमेहाचा धोका वाढतो. अस्थमाच्या समस्यांमुळे रात्री व्यवस्थित झोप येत नाही, ज्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. थायरॉइडच्या समस्येमुळे ऊर्जा कमी होते, ज्यामुळे थकवा वाढतो. काही विशिष्ट आजार किंवा आरोग्य समस्यांमुळे थकवा जाणवू शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





