Marathi News

कच्चं दूध पिणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या परिणाम…

Published:
दूध हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक ग्लास दुध प्रोटीन, कॅल्शियम समृद्ध असते. जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.
कच्चं दूध पिणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या परिणाम…

दूध हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक ग्लास दुध प्रोटीन, कॅल्शियम समृद्ध असते. जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. दुधामध्ये बरेच प्रकारचे एंजाइम आढळतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना कच्चे दूध पिणे आवडते.  पण बहुतेक लोकांना हे माहित नाही की कच्चे दूध पिणे योग्य आहे की नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कच्चे दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की नाही, तर चला जाणून घेऊया कच्च्या दुधाचे तोटे आणि फायदे…

कच्च्या दुधाचे दुष्परिणाम

कच्च्या दुधात मुबलक प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. पण त्याचे अनेक तोटे देखील आहेत. जास्त कच्चे दूध सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यात अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात, जे आजार निर्माण करू शकतात. कच्च्या दुधात साल्मोनेला, लिस्टेरिया, ई. कोलाई यांसारखे हानिकारक जीवाणू असू शकतात, जे अन्न विषबाधा आणि इतर गंभीर आजार निर्माण करू शकतात. कच्चे दूध पिणे किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने जुलाब, पोटदुखी, मळमळ, उलट्या, ताप येऊ शकतो. कच्चे दूध गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी विशेषतः धोकादायक असू शकते. 

कच्च्या दुधाचे फायदे

कच्च्या दुधाचे अनेक फायदे आहेत. हे दूध पचन सुधारण्यास, स्नायू आणि हाडांना मजबूत बनविण्यात, आणि वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय, हे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते. कच्चे दूध हे वजन कमी करण्यास मदत करू शकते कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, आणि इतर पोषक तत्वे असतात, ज्यामुळे चयापचय सुधारतो. कच्चे दूध हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews