Marathi News

जास्त जिरे खाणे आरोग्यासाठी हानिकारक, होऊ शकतात ‘या’ समस्या

Published:
जास्त जिरे खाणे हानिकारक असू शकते, जास्त जिरे खाल्ल्याने पचनसंस्थेच्या समस्या, तसेच काही गंभीर समस्या होऊ शकतात.
जास्त जिरे खाणे आरोग्यासाठी हानिकारक, होऊ शकतात ‘या’ समस्या

जिरे आपल्या जेवणाची चव वाढवते. जिरे प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला मसाला आहे. जेवणाची चव द्विगुणित करणारे जिरे आरोग्यासाठी फायदेशीर असते पण कधीकधी ते हानिकारक देखील असते. खरं तर, काही लोक ते जास्त प्रमाणात सेवन करू लागतात. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात घेत असाल तर आजच ते थांबवा. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. आज आम्ही तुम्हाला जास्त जिरे खाण्याचे तोटे काय आहेत ते सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया…

ऍलर्जी

जास्त जिरे खाल्ल्याने काही लोकांना ऍलर्जी येऊ शकते. ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज येणे, किंवा श्वासोच्छ्वास होणे यांसारख्या समस्या येऊ शकतात. ऍलर्जीमुळे घसा किंवा तोंडाला सूज येऊ शकते. 

गॅस आणि एसिडिटी

जास्त जिरे खाणे हानिकारक होऊ शकते. जास्त प्रमाणात जिरे खाल्ल्याने गॅस आणि एसिडिटी होऊ शकते, तसेच काही लोकांना उल्टी देखील होऊ शकते. जास्त जिरे खाल्ल्याने पचन सुधारण्याऐवजी गॅस आणि एसिडिटी वाढू शकते. जिरे उष्ण असते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास गॅस आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. काही लोकांना जीरेमुळे एसिडिटी किंवा छातीत दुखण्याची समस्या येऊ शकते.

गर्भपात

गरोदरपणात जास्त जिरे खाणे हानिकारक असू शकते. जिरे गरम असल्याने, त्याचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भपात किंवा इतर समस्या येऊ शकतात. जास्त प्रमाणात जिरे खाल्ल्यास, गर्भाशयातील स्नायू उत्तेजित होऊ शकतात, ज्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढू शकते. 

रक्तातील साखरेची पातळी कमी होणे

जास्त जिरे खाणे, विशेषत: मधुमेह असलेल्या लोकांसाठी हानिकारक असू शकते. जास्त जिरे घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येणे, थकवा आणि इतर समस्या येऊ शकतात. रक्तातील  साखरेची पातळी कमी झाल्यास, थकवा येऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews