Marathi News

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर सावधान, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Last Updated:
काही लोकांना अशी सवय असते की ते चहा प्यायल्यानंतर लगेच पाणीदेखील पितात. आणि हीच सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर सावधान, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

भारतातील अनेक लोकांना चहाचे वेड आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पिणे आवडते. चहा आरोग्यासाठी हानिकारक मानला जात असला तरी, चहाप्रेमींना हे समजत नाही. डॉक्टरही बहुतेक लोकांना चहा न पिण्याचा सल्ला देतात. काही लोक चहा प्यायल्यानंतर पाणी देखील पितात जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. चहा नंतर पाणी पिण्याचे अनेक तोटे आहेत. चहानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक असू शकते. चहानंतर लगेच पाणी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या…

चहा नंतर पाणी पिण्याचे तोटे

चहा पिऊन लगेच पाणी प्यायल्याने अनेक आरोग्य समस्या येऊ शकतात. विशेषतः गरम चहा प्याल्यावर लगेच थंड पाणी प्याल्याने पचनक्रिया बिघडते, सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते, आणि दातांची समस्या देखील येऊ शकते.

पचनक्रिया बिघडते

गरम चहा प्याल्यावर लगेच थंड पाणी पिल्याने पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे एसिडिटी, गॅस, आणि अपचन यांसारख्या समस्या वाढू शकतात. काही लोकांना ऍसिडिटीमुळे अल्सर होण्याची शक्यता असते, आणि चहा पिऊन लगेच पाणी प्यायल्यास ही समस्या वाढू शकते. 

दात व हिरड्यांच्या समस्या

चहा पिऊन लगेच पाणी पिणे दात आणि हिरड्यांसाठी हानिकारक असू शकते. गरम चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे, तोंडातील तापमानातील अचानक बदल घडवते, ज्यामुळे दातांमध्ये वेदना, सेन्सेटिव्हिटी आणि हिरड्यांच्या समस्या येऊ शकतात. चहा प्यायल्याने दातांवर डाग आणि पिवळेपणा येऊ शकतो, जो थंड पाण्याने अधिक दिसू लागतो. चहा आणि पाणी पिण्याने दात किडण्याची शक्यता वाढू शकते.

सर्दी-खोकला

गरम चहा आणि लगेच थंड पाणी यामुळे शरीर थंड होते आणि सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढू शकते. चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी आणि फ्लू होण्याची शक्यता वाढते. गरम चहानंतर थंड पाणी प्यायल्याने घशात खवखव जाणवू शकते, आणि काही वेळा इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews