घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सणावाराच्या दिवसांमध्ये घरात नेमकी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. रोज डाळ भात भाजी चपाती खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हंडी कढाई पनीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

साहित्य

  • पनीरचे तुकडे
  • कांदा
  • टोमॅटो
  • आले-लसूण पेस्ट
  • शिमला मिरची
  • ते
  • जिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी, विलायची
  • हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड
  • गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • पाणी

कृती

  • एका कढईत तेल गरम करा आणि जिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि विलायची घालून परता.
  • बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.
  • टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, धणेपूड आणि जिरेपूड घालून चांगले मिक्स करा.
  • चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून ग्रेव्ही तयार करा.
  • चिरलेली शिमला मिरची आणि कांदा घालून नरम होईपर्यंत शिजवा.
  • पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • गरम मसाला घालून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवा.
  • गरमागरम सर्व्ह करा.