तुम्हाला कानदुखीचा त्रास होत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, लवकर मिळेल आराम

Published:
रात्रीच्या वेळेस अचानक कानदुखी सुरू झाल्यास घाबरून न जाता आयुर्वेदातील हा घरगुती उपाय करून कानदुखीवरुन तात्काळ आराम मिळवता येतो.
तुम्हाला कानदुखीचा त्रास होत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, लवकर मिळेल आराम

प्रत्येक व्यक्तीला झोप खूप आवडते. कधीकधी शरीरातील काही समस्यांमुळे रात्रभर झोप लागणे कठीण होते. कधीकधी झोपेत असताना अचानक कान दुखू लागतो. ज्यामुळे तुम्ही व्यवस्थित झोपू शकत नाहीत. कान दुखणे ही सामान्य समस्या आहे. कानात वेदना बहुतेकदा कानात घाण आणि पाणी शिरल्यामुळे होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला रात्रीच्या वेळी कान दुखण्याचा त्रास होत असेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही कानदुखीपासून आराम मिळवू शकता.

लसूण आणि मोहरीचं तेल

जर तुम्हाला कानदुखीची समस्या असेल तर तुम्ही त्यावर लसूण वापरू शकता. यासाठी तुम्ही दोन-तीन लसणाच्या पाकळ्या घ्या. त्या मोहरीच्या तेलात टाका आणि मंद आचेवर गरम करा. लसूण जरा लालसरसर होईपर्यंत तेल तापू द्या. मग हे तेल थोडं थंड करून कोमट झाल्यावर कानात दोन-तीन थेंब टाका. पाच मिनिटं थांबा. हा उपाय दिवसातून दोन-तीन वेळा करा.

कांद्याच्या रसाचा वापर

कानाच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम हवा असेल तर कांद्याचा रस फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला कांद्याचा रस थोडा गरम करावा लागेल. त्यानंतर कानात कांद्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब टाका. यामुळे कान दुखीपासून लवकर आराम मिळतो.

मोहरीचे तेल वापरा

कानदुखीसाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. मोहरीचे तेल कानातील घाण आणि मळ काढण्यास मदत करते, ज्यामुळे कान स्वच्छ राहतात. मोहरीचे तेल गरम करून कोमट झाल्यावर 2-3 थेंब कानात टाका. 10-15 मिनिटे तसेच ठेवा, आणि नंतर साफ कपड्याने पुसा. 

पुदिन्याच्या पानांचा वापर

कानदुखीपासून आराम मिळविण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी पुदिन्याच्या पानांचा रस काढून कानात दोन ते तीन थेंब टाका. ज्यामुळे कानदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews