रोज रोज त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. अनेकदा घरातला भाजीपालाही संपतो. अशावेळी तुम्ही हटके अशी बेसन-कांद्याची भाजी बनवू शकता. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात…
साहित्य
- २-३ मोठे कांदे
- १ कप बेसन
- १/२ चमचा हळद
- १ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा गरम मसाला
- १/२ चमचा जिरे
- १/२ चमचा मोहरी
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार कोथिंबीर
- आवश्यकतेनुसार पाणी
- तेल
कृती
- कांदे बारीक चिरून घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, टाकून फोडणी करा.
- त्यात कांदा टाकून गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्या.
- हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड टाकून छान परतून घ्या.
- आता त्यात हळूहळू बेसन टाकत राहा आणि परतत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
- मीठ घालून बेसन व्यवस्थित भाजलं जाईपर्यंत आणि भाजी कोरडीसर होईपर्यंत मंद आचेवर परता.
- काही वेळ झाकण ठेवून भाजी शिजू द्या.
- शेवटी वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.





