Cheese Balls Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ‘चीज बॉल्स’,जाणून घ्या झटपट होणारी रेसिपी

Published:
अनेकदा स्टाटर्ससाठी बनवले जाणारे पदार्थही नाश्त्याला अनेकजण आवडीने खातात. यात चीज बॉल्स अनेकांना आवडतो. आज आपण याच पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत.
Cheese Balls Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ‘चीज बॉल्स’,जाणून घ्या झटपट होणारी रेसिपी

अनेकदा काहीतरी चटपटीत खावसं वाटतं म्हणून आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. स्नॅक्स टाईम झाला की वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याची इच्छा होते.  पण अगदी कमी साहित्य वापरून आपण ती घरीसुद्धा सोप्या पद्धतीने करू शकता. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, पार्टी मेन्यूसाठी किंवा पाहुण्यांना खास काही द्यायचं असेल तर ‘चीज बॉल्स’, हा उत्तम पर्याय आहे. चला याची रेसिपी जाणून घेऊयात..

साहित्य

  • उकडलेले बटाटे (४-५)
  • किसलेले चीज (आवडीनुसार)
  • ब्रेडक्रंब्स
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • आवडीचे मसाले (उदा. काळी मिरी पावडर, जिरे पावडर)
  • मीठ (चवीनुसार)
  • कॉर्नफ्लोअर  

कृती

  • उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यात किसलेले चीज, ब्रेडक्रंब्स, कोथिंबीर, मसाले आणि मीठ घालून चांगले एकत्र करा.
  • या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवा.
  • एका भांड्यात कॉर्नफ्लोअर घ्या आणि त्यात तयार केलेले गोळे व्यवस्थित घोळवा.
  • एका कढईत तेल गरम करा.
  • तेल गरम झाल्यावर तयार चीज बॉल्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरम चीज बॉल्स टोमॅटो केचप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. 

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews