Marathi News

तोंडात टाकताच विरघळणारी नाशिकचि प्रसिद्ध खुरचन वडी, वाचा रेसिपी…

Last Updated:
रवा बेसन वडी बनवण्यासाठी, रवा आणि बेसन भाजून घ्या, साखर आणि पाणी घालून पाक तयार करा, आणि मग हे मिश्रण एकत्र करून वड्या कापून घ्या.
तोंडात टाकताच विरघळणारी नाशिकचि प्रसिद्ध खुरचन वडी, वाचा रेसिपी…

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी गोड पदार्थ काय बनवावं? असा प्रश्न अनेकदा सगळ्यांचं पडतो. अशावेळी झटपट तुम्ही तोंडात टाकताच विरघळणारी रवा-बेसन वडी बनवू शकता. रवा-बेसन वडी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया रवा-बेसन वडी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • एक वाटी बेसन
  • अर्धी वाटी रवा
  • एक वाटी साखर
  • अर्धी वाटी पाणी
  • चिमूटभर वेलची पूड
  • आवश्यकतेनुसार तूप

कृती

कढईत तूप गरम करून त्यात रवा आणि बेसन घालून मंद आचेवर छान भाजून घ्या. रवा आणि बेसन सोनेरी होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजणे आवश्यक आहे. भाजताना गॅस मंद ठेवा आणि सतत ढवळत राहा. भाजलेले मिश्रण थोडे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा आणि एकतारी पाक तयार करा. भाजलेले मिश्रण आणि वेलची पूड पाकात घालून चांगले मिक्स करा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. गरजेनुसार थोडे तूप घाला. तयार मिश्रण तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्या. चमच्याने किंवा वाटीने एकसारखे थापून घ्या. गरम असतानाच वड्या कापून घ्या. वडी पूर्णपणे थंड झाल्यावर काढा. 

टीप

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त तूप वापरू शकता.
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता.
  • वडी थापताना ती जास्त जाड किंवा पातळ नसावी.
  • वडी पूर्णपणे थंड झाल्यावरच कापून घ्या. 

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews