Which dry fruits are beneficial for the liver: आजकाल बहुतांश लोक निरोगी राहण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात. ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर मानले जाते. त्यांचे सेवन केल्याने शरीराचे पोषण होते आणि आरोग्य चांगले राहते. ड्रायफ्रूट्स हृदय, यकृत निरोगी ठेवण्यास आणि ऊर्जा प्रदान करण्यास देखील मदत करतात.
त्यामुळेच शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक असलेल्या लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठीसुद्धा ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु लिव्हरच्या आरोग्यासाठी कोणते ड्रायफ्रूट्स जास्त फायदेशीर आहेत हे अनेकांना माहिती नसते. आज आपण त्याबाबतच जाणून घेऊया……
अंजीर –
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे यकृत म्हणेजच लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक एंजाइम असतात जे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, यकृताचे कार्य सुधारण्यास आणि नुकसान टाळण्यास मदत करतात. शिवाय, ते पचन सुधारण्यास देखील मदत करतात. अंजीर भिजवून खाणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.
खजूर –
खजूर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामध्ये फायबर, लोह आणि पोटॅशियमसह अनेक पोषक तत्वे समृद्ध आहेत. त्यांचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते. ते यकृताचे कार्य सुधारण्यास आणि यकृत निरोगी राखण्यास मदत करते.
बदाम –
बदाम यकृतासाठी फायदेशीर आहेत. त्यात निरोगी फॅट्स , व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. त्यांचे सेवन केल्याने यकृताचे कार्य सुधारू शकते आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध होऊ शकतो.ज्यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्या दूर होण्यास आणि निरोगी राहण्यास मदत होते.
अक्रोड –
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. तसेच त्यात अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. म्हणून, अक्रोड खाल्ल्याने यकृताच्या पेशींचे संरक्षण करण्यास, यकृताचे कार्य सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





