Home remedies for lung detoxification: फुफ्फुसे हे शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. ते संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. प्रदूषण, हंगामी ऍलर्जी, श्वसन संसर्ग आणि धूम्रपान यासारख्या इतर समस्यांमुळे फुफ्फुसांमध्ये कफ जमा होऊ शकतो. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
नैसर्गिकरित्या कफ म्हणजेच श्लेष्मा काढून टाकण्यासाठी, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्मांनी समृद्ध असलेले काही डिटॉक्स ड्रिंक आहारात समाविष्ट केली जाऊ शकतात. त्यामुळेच आज आपण फुफ्फुसांना डिटॉक्सिफाय करणारे आणि श्लेष्मा बाहेर काढणारे काही ड्रिंक्स जाणून घेऊया……
आल्याचा चहा-
आल्याच्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म भरपूर असतात. ते अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळवण्यास मदत करते. हा चहा सेवन केल्याने श्वसनाच्या समस्या, सर्दी आणि स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळतो.
-आल्याच्या चहामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. ते सेवन केल्याने जाड श्लेष्मा फुटण्यास आणि पातळ होण्यास मदत होते. यामुळे बॅक्टेरियाचे संक्रमण टाळण्यास आणि श्वसनमार्गातील जळजळ कमी करण्यास देखील मदत होते. तसेच या चहाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
लवंगाचा चहा –
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या लवंगामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री , अँटी बॅक्टेरियल, बुरशीनाशक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. लवंग खाल्ल्याने जळजळ कमी होते, संसर्ग रोखता येतो आणि श्लेष्मा सैल होतो. त्यामुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात.
-लवंगाचे अँटी इन्फ्लीमेंट्री , अँटी बॅक्टेरियल गुणधर्म श्वसन संसर्ग रोखण्यास मदत करतात. ते ब्रोन्कियल ट्यूब्स म्हणजेच श्वसन मालिकेतील सूज कमी करण्यास मदत करतात. लवंग चहामधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म घसा खवखवणे, श्वसनमार्गात श्लेष्मा निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास, श्लेष्मा पातळ करण्यास आणि रक्त स्वच्छ करण्यास मदत करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






