Marathi News

फुफ्फुसे मजबूत ठेवतील ‘हे’ ४ आयुर्वेदिक उपाय, नियमित केल्यास मिळेल फायदा

Published:
श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी फुफ्फुसे निरोगी आणि मजबूत ठेवणे फारच आवश्यक आहे.
फुफ्फुसे मजबूत ठेवतील ‘हे’ ४ आयुर्वेदिक उपाय, नियमित केल्यास मिळेल फायदा

Ayurvedic remedies for healthy lungs:   आजकल निरोगी लाइफस्टाइल जगणे प्रत्येकासाठीच एक कठीण काम बनले आहे. बदलेली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवत असतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे श्वसनाच्या किंवा फुफ्फुसांच्या समस्या होय. हिवाळ्यात फुफ्फुसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. बदलेले थंड वातावरण आणि प्रदूषण यामुळे श्वास घेणेदेखील कठीण होते.

श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी फुफ्फुसे निरोगी ठेवणे फारच आवश्यक आहे. फुफ्फुसे मजबूत असतील तर श्वसनाच्या समस्यादेखील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आज आपण फुफ्फुसे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया….

 

पिंपळी-

आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातीलच एक औषधी वनपस्ती म्हणजे पिंपळी होय. पिंपळी ही औषधीय गुणधर्मांनीसमृद्ध आहे. विविध आजार दूर करण्यासाठी पिंपळी वापरली जाते. पिंपळी ही काळ्या मिरीसारखी चवीला तिखट असते. त्याच्या फळांसोबतच पाने आणि फांद्यासुद्धा औषधी असतात. पिंपळी फुफ्फुसे मजबूत करून दम्यासारख्या आजारात उपयुक्त ठरते.

 

ज्येष्ठमध-

ज्येष्ठमधाला आयुर्वेदात विविध आजारांवरील एक उपयुक्त औषध समजले जाते. ज्येष्ठमधात अँटी डायबिटिक आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. ज्येष्ठमध गोड खाण्याची इच्छा कमी करते. तसेच त्याच्यातील गुणधर्म फुफ्फुसे मजबूत करण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी दररोज रात्री एक ग्लास दुधात एक चमचा ज्येष्ठमध पावडर घालून सेवन केल्यास फायदा मिळेल.

फॅटी फिश-
फॅटी फिशमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते. ओमेगा ३ फॅटी ऍसिड फुफ्फुसांसाठी अतिशय फायदेशीर असते. यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री, अँटी ऑक्सिडेटिव्ह, अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. हे गुणधर्म फुफ्फुसांना सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे फुफ्फुसे मजबूत आणि निरोगी राहतात.

सफरचंद-
दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, लिंबूवर्गीय फळे समाविष्ट केल्यास फुफ्फुसे नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होते. फुफ्फुसे स्वच्छ राहिल्यास आपोआप मजबूत आणि निरोगी बनतात. त्यामुळे आहारात या गोष्टींचा अवश्य समावेश करावा.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews