फुफ्फुसांना मजबूत करून कार्यक्षमता वाढवण्यासाठी करा ‘ही’ योगासने, आतून होतील स्वच्छ

Published:
फुफ्फुसांना मजबूत करून कार्यक्षमता वाढवण्यासाठी करा ‘ही’ योगासने, आतून होतील स्वच्छ

Healthy lungs exercise in Marathi:    वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो. प्रदूषणामुळे फुफ्फुस कमकुवत होतात आणि त्यांची कार्य क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत, काही योगासने फुफ्फुसांना बळकटी देऊ शकतात आणि त्यांचे कार्य सुधारू शकतात.

काही योगासने फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर आहेत. ही योगासने फुफ्फुसांना डिटॉक्सिफाई करतात आणि त्यांची क्षमता वाढविण्यास देखील मदत करतात. चला जाणून घेऊया ही योगासने कोणती आहेत.

 

कपालभाती प्राणायाम-

फुफ्फुसांना डिटॉक्सीफाई करण्याचा प्राणायाम हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हा प्राणायाम फुफ्फुसांमध्ये साचलेली अशुद्धी साफ करतो आणि श्वसन क्षमता सुधारतो.

कसे करावे?
सर्वप्रथम सुखासन किंवा पद्मासनात बसा.
मोठा श्वास सोडा आणि पोटात ओढा.
५०-१०० वेळा पुनरावृत्ती करा.

 

अनुलोम-विलोम प्राणायाम-

हा प्राणायाम फुफ्फुसांना शुद्ध करतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढवतो. त्यामुळे फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि ताण कमी होतो.

कसे करावे?
यासाठी सर्वप्रथम सुखासनात बसा आणि उजव्या हाताच्या अनामिकेने डावी नाकपुडी बंद करा.
उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, नंतर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा.
ही प्रक्रिया ५-१० मिनिटे पुन्हा-पुन्हा करा.

भुजंगासन
भुजंगासन छाती आणि फुफ्फुसांना उघडण्यास मदत करते. हे आसन श्वसनसंस्था मजबूत करते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते. ते फुफ्फुसांना विषमुक्त करते आणि त्यांचे ऑक्सिजन शोषण वाढवते.

कसे करावे?

पोटावर झोपा आणि तुमचे तळवे तुमच्या नितंबाजवळ ठेवा.

आता श्वास घ्या, छाती वर करा आणि तुमची कंबर ताणा.

१५-३० सेकंद या स्थितीत राहा, सामान्यपणे श्वास घ्या.

हळूहळू श्वास सोडा आणि जमिनीवर परत या.

मत्स्यासन-
हे आसन फुफ्फुसांना पूर्णपणे उघडून डिटॉक्सीफाई करण्यास मदत करते. ते फुफ्फुसांची क्षमता वाढवते आणि त्यांना बळकटी देते.

कसे करावे?
हात शरीराखाली ठेवून पाठीवर झोपा.
श्वास घ्या, छाती वर करा आणि डोके मागे झुकवा.
२०-३० सेकंद या स्थितीत राहा, आणि खोल श्वास घ्या.
हळूहळू सामान्य स्थितीत परत या.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews