मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे थकवा आलाय? आहारात सामील करा ‘हे’ ४ पदार्थ

Published:
तज्ज्ञांच्या मते, शारीरिक थकवा येण्याचे मुख्य कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता होय.
मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे थकवा आलाय? आहारात सामील करा  ‘हे’ ४ पदार्थ

What foods to eat to increase magnesium:  आजकाल बदलेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि सतत बैठ्या कामामुळे शारीरिक थकवा ही एक सामान्य समस्या बनली आहे. थकवा दूर करण्यासाठी लोक एनर्जी ड्रिंक्स, कॉफी, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि चहाकडे वळतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला थकवा का जाणवतो.

तज्ज्ञांच्या मते शारीरिक थकवा येण्याचे मुख्य कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता होय. ज्या लोकांच्या आहारात पुरेसे मॅग्नेशियम नसते त्यांना शारीरिक थकवा येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच आपण शारीरिक थकवा दूर करून मॅग्नेशिअम वाढवण्यासाठी काय काय खावे याबाबत जाणून घेऊया……

दही-
दही कॅल्शियम, प्रथिने आणि प्रोबायोटिक्ससाठी ओळखले जाते.परंतु त्यात मॅग्नेशियमचे प्रमाणही चांगले असते. दररोज दुपारच्या जेवणात दही खाल्ल्याने शारीरिक थकवा दूर होतो. दही पोटातील चांगले बॅक्टेरिया देखील वाढवते.ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.

डार्क चॉकलेट –
मॅग्नेशियमची कमतरता दूर करण्यासाठी डार्क चॉकलेट खूप फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते, १ औंस डार्क चॉकलेटमध्ये ६४ मिलीग्राम मॅग्नेशियम असते. डार्क चॉकलेटमधील पोषक तत्वे शारीरिक थकवा दूर करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतात. डार्क चॉकलेटमध्ये थियोब्रोमाइन आणि मॅग्नेशियम दोन्ही असतात. जे थकवा दूर करून उत्साह निर्माण करतात.

काजू आणि शेंगदाणे –
काजू, बदाम आणि शेंगदाणे हे ड्रायफ्रूट्स म्हणून ओळखले जातात. हे काजू मॅग्नेशियमने समृद्ध असतात. १०० ग्रॅम बदामात १८ मिलीग्राम मॅग्नेशियम असते, १०० ग्रॅम काजूमध्ये ४० मिलीग्राम मॅग्नेशियम असते आणि १०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये ५० ते ५५ मिलीग्राम मॅग्नेशियम असते. नाश्त्यात दररोज हे पदार्थ सेवन केल्याने मॅग्नेशियम भरून निघण्यास आणि शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते.

पालक-
पालक ही हिरवी पालेभाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक कप उकडलेल्या पालकामध्ये १५७ मिलीग्राम मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम व्यतिरिक्त, पालकमध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, जीवनसत्त्वे अ, क, के आणि फोलेट देखील असते. हे सर्व पोषक घटक एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)