दुपारच्या नाश्त्याला बनवा चीज फिंगर, २० मिनिटांत बनणारी सोपी रेसिपी

Published:
आज आपण अगदी १५ ते २० मिनिटांत बनणारी चीज फिंगरची रेसिपी पाहणार आहोत.
दुपारच्या नाश्त्याला बनवा चीज फिंगर, २० मिनिटांत बनणारी सोपी रेसिपी

Cheese Finger Recipe:    घरातील कामांसोबत मुलांच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत बनवणे हा महिलांसाठी एक फारच कठीण प्रश्न असतो. अनेकांना दुपारी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यामुळे महिला हलक्या फुलक्या रेसिपीज शोधत असतात.

आज आपण अशीच एक सोपी परंतु अत्यंत टेस्टी रेसिपी पाहणार आहोत. आज आपण अगदी १५ ते २० मिनिटांत बनणारी चीज फिंगरची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी मुलांना तर आवडेलच पण मोठेही आवडीने खातील. चला पाहूया रेसिपी…

चीज फिंगर बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

२०० ग्राम मोझरेला चीज

३ टेबलस्पून मैदा

३ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर

एक टीस्पून काळी मिरी

१ टीस्पून ऑरगॅनो

ब्रेडक्रम्ब्स

टाळण्यासाठी तेल

चवीनुसार मीठ

चीज फिंगर बनवण्याची रेसिपी-

चीज फिंगर बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लॉवर, हर्ब्स, काळी मिरी, आणि मीठ घेऊन एक जाडसर मिश्रण तयार करा.

आता मोझरेला चीज कट करून घ्या त्याला त्या मैद्याच्या मिश्रणात चांगले बुडवून घ्या.

नंतर त्यावर ब्रेडक्रम्ब्स लावून घ्या.

आता गॅसवर कढई ठेऊन तेल गरम करा.

आता पुन्हा एकदा मोझरेला चीज मिश्रणात बुडवून ब्रेडक्रम्ब्समध्ये बुडवून घ्या.

तेल गरम झाल्यावर चीजला एक स्टिक लावून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

अशाप्रकारे चीज फिंगर तयार आहेत. तुम्ही टोमॅटो सॉससोबत ते सर्व्ह करू शकता.