Marathi News

घरातच बनवा मार्केटसारखी गुलकंद बर्फी, पाहा सोपी रेसिपी

Published:
तुम्हाला घरातच मार्केटसारखी गुलकंद बर्फी खायची असेल, तर आमची ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.
घरातच बनवा मार्केटसारखी गुलकंद बर्फी, पाहा सोपी रेसिपी

Marathi recipe for Gulkand Barfi:   गुलकंद आरोग्यासाठी जितके फायदेशीर असते तितकेच ते चवीलासुद्धा चविष्ट असते. गुलकंद दररोज खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण गुलकंद खाण्याऐवजी त्याचे विविध पदार्थ बनवून खाण्याला पसंती देतात. त्यापैकीच एक म्हणजे गुलकंद बर्फी होय. आज आपण गुलकंद बर्फीची रेसिपी जाणून घेणार आहोत.

 

गुलकंद बर्फीसाठी साहित्य-

 

२५० ग्रॅम दूध
५० ग्रॅम गुलकंद
१०० ग्रॅम सुकामेवा
२०० ग्रॅम मिल्कमेड

 

गुलकंद बर्फीची रेसिपी-

 

सर्वप्रथम, गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात दूध घाला आणि ते चांगले उकळवा.

दूध उकळू लागले की, त्यात मिल्कमेड घाला आणि ते आटेपर्यंत शिजवा. दूध चांगले सुकले की, त्यात ड्रायफ्रूट्स घाला.

आता एक प्लेट घ्या, त्यावर तूप लावा, त्यात बर्फी घाला आणि दोन तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

ते पूर्णपणे थंड झाल्यावर, ते तुमच्या आवडीच्या आकारात कापून घ्या.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews