घरातच बनवा मार्केटसारखे पीनट बटर, २ साहित्यात बनणारी रेसिपी

Published:
पीनट बटर बनवण्याची रेसिपी तर सोपी आहेच शिवाय घरी बनवल्याने ते भेसळमुक्तदेखील असते.

Peanut Butter Marathi Recipe:   मुलांना पीनट बटर खायला खूप आवडते. त्यांना ब्रेडवर लावून खायला किंवा तसेच खायला मज्जा येते. आपण पीनट बटर नेहमीच बाजारातून खरेदी करतो. परंतु आता तुम्ही ते घरी बनवू शकता. पीनट बटर बनवण्याची रेसिपी तर सोपी आहेच शिवाय घरी बनवल्याने ते भेसळमुक्तदेखील असते. चला जाणून घेऊया रेसिपी…

 

पीनट बटर बनवण्यासाठी साहित्य-

 

१ कप शेंगदाणे
१ टीस्पून गूळ
चिमूटभर मीठ (पर्यायी)

 

पीनट बटर बनवण्याची रेसिपी-

 

शेंगदाणे कोरडे भाजून घ्या आणि थोडे थंड झाल्यावर त्यांची साल काढून टाका.

हे शेंगदाणे मिक्सरमध्ये टाका आणि त्यांची पावडर बनवण्यासाठी बारीक करा. आता ते आणखी वाटून घ्या म्हणजे शेंगदाणे पेस्टसारखे बनू लागतील.

आता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्या जेणेकरून जास्त तेल सुटेल आणि पेस्ट बनेल.

आता त्यात गूळ आणि मीठ घाला आणि नंतर ते दोन वेळा मळून घ्या जेणेकरून ते बटरसारखे होईल.

पीनट बटर तयार आहे, ते स्वच्छ कोरड्या बरणीत काढा आणि तुम्हाला हवे तेव्हा स्मूदी, सॅलड, लाडू किंवा सँडविच बनवण्यासाठी वापरा. मुलांना ते असेच खायला आवडते.

लेखकाबद्दल
Aiman Jahangir Desai
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते.